निधन वार्ता
सुभाष डरांगे यांचे निधन

न्युजसेवा
संवत्सर- (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी सुभाष नाना डरांगे (वय -७६)यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.सुभाष दरांगे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.ते कै.नामदेवराव परजणे यांचे निष्ठावान सहकारी मानले जात.ते स्व.नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.