जयंती,पुण्यतिथी अभिवादन
संत तुकारामांनी नैतिक अधोगती थांबविण्याचे महत्त्वाचे कार्य केले-…या महाराजांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संत तुकाराम यांनी मानवी मूल्य जपत नम्रतेने,शांतपणे जनसेवा केली.त्यांनी फक्त लोकांना उपदेश दिला नाही तर, तो त्यांनी स्वतःही अंगीकारला आणि इतरांनाही सांगितला असुन संत तुकाराम महाराजांनी सर्वसामान्य लोकांची वैचारिकता बदलून नैतिक अधोगती थांबविण्याचे महत्त्वाचे कार्य केले असल्याचा उपदेश ह.भ.प.संजय महाराज जगताप,भऊरकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
“संत तुकाराम बीज हा संत तुकारामांचा मृत्यूदिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो.हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे असे माननारा एक मतप्रवाह आहे.फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते.तो दिवस राज्यातील भाविक संत तुकारांमांचे स्मरण करून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात”-ह.भ.प.संजय महाराज जगताप.
संत तुकाराम बीज हा संत तुकारामांचा मृत्यूदिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो.हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे असे माननारा एक मतप्रवाह आहे.फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते.तो दिवस राज्यातील भाविक संत तुकारांमांचे स्मरण करून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथेही संत तुकाराम बीज उत्सव मोठ्या श्रद्धेने संपन्न झाला त्या वेळी मंदिर प्रांगणात त्यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी खंडाळा व परिसरातील विविध मान्यवरांसह भाविक भक्त.महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”त्याकाळी तुकाराम महाराज यांना काही लोकांनी खूप त्रास दिला तरीही त्यांच्याविषयी कटूपणा न ठेवता उलट ते म्हणाले, “कोणाही जीवाचा न घडो मत्सर” करुणा,प्रेम,अहिंसा याची शिकवण त्यांनी सदैव दिली.काव्यरचना लिहून अभंगातून नामाचा महिमा सांगितला.तुकाराम महाराजांची वाणी अतिशय प्रेमळ होती तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान हे सर्वसामान्याच्या उन्नतीसाठी,कल्याणासाठी होते मनाचे दार उघडे ठेवून जीवनाकडे पाहायला ते सांगत होते धश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांना विचारांची नवी दिशा देऊन त्यांना ज्ञानदानाचे कार्य करत अज्ञान दूर केले.अनेक अभंग रचले,भजन,कीर्तनातून अडाणी,अज्ञानी लोकांना समजेल, अशा शब्दांत नवीन विचार जनतेच्या मनात रुजविले होते.शुद्ध सद्विवेकबुद्धीने त्यांना जे अध्यात्म उलगडलं,समजलं,परमेश्वर चिंतनातून त्यांना जे ज्ञान मिळालं ते अभंगाच्या माध्यमातून त्यांनी संग्रही करूनपुढच्या पिढ्यांना दिलं.जप,तप,ध्यान-धारणेतून जो ज्ञानाचा प्रकाश मिळाला तो त्यांनी समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी वापरला.परोपकारासाठी संतांचे जीवन असते हे सुद्धा त्यांनी समाजाला दाखवून दिले असल्याचे महंत संजय महाराज जगताप भऊरकर यांनी शेवटी सांगितले आहे.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त तुकाराम महाराज मंदिर येथे दि.१३ ते २० पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सकाळी ८ ते १ पर्यंत गाथा पारायण,व सायंकाळी ४ ते ५ पर्यंत हरीपाठ व रात्री ९ ते ११ वाजता किर्तन दि.२० रोजी सकाळी मिरवणूक काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत तुकाराम महाराज समिती व ग्रामस्थांनी प्रयत्न केले तर खंडाळा व परीसराततील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.