जयंती,पुण्यतिथी अभिवादन
स्व.परजणे यांचा स्मृतिदिन होणार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी तालुका सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष स्व.नामदेवराव परजणे यांच्या १९ व्या पुण्यस्मरणा निमित्त आगामी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात ह.भ.प.प्रशांत महाराज ताकोते यांचे,’युगधंर श्रीकृष्ण’ या विषयावर तर कु.कोमल बाळासाहेब पोळ यांचे,’देखणे ते जगणे’तर प्राचार्य प्रदीप कदम सर यांचे,’प्रेरणा युवकांसाठी’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील शिक्षण तज्ज्ञ अनिल गुंजाळ हे राहणार असल्याची माहिती महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
स्व.नामदेवराव परजणे यांच्या १९ व्या पुण्यस्मरणा निमित्त आगामी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात ह.भ.प.प्रशांत महाराज ताकोते यांचे,’युगधंर श्रीकृष्ण’ या विषयावर संपन्न झाले असून दि.१९ जून रोजी कु.कोमल बाळासाहेब पोळ यांचे,’देखणे ते जगणे’तर दि.२० जून रोजी प्राचार्य प्रदीप कदम सर यांचे,’प्रेरणा युवकांसाठी’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे.
स्व.नामदेवराव परजणे यांचे गोदावरी कोपरगाव तालुका सहकारी दूध संघ स्थापनेत मोठे योगदान राहिले आहे.त्यांनी आपल्या कर्तृत्वावर तालुक्यात मोठा कार्यकर्त्यांचे मोहळ तयार केले होते.त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आजही हयात आहेत.अनेकांनी तर ते निवडणुकीत विजयी होत नाही तो पर्यंत आपल्या पायात चप्पल घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती.यावरून त्यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम प्रतीत होत असून त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचा गुण तालुक्यातील युवकांसाठी मोठा प्रेरणादायी ठरला होता.त्यांचा गोदावरी तालुका दूध संघावरून तत्कालीन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचेशी मोठा राजकीय संघर्ष घडून आला होता.त्यात त्यांची निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर सरशी झाली होती.त्यांनी एकमेकांवर शेकड्याने खटले दाखल केले होते.अखेर कोल्हे यांना दोन पावले मागे येऊन समझोता करावा लागला होता.त्यांची शब्दावर असलेली पकड आणि कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम हे कायमचे स्मरणात राहणारे ठरले आहे.त्यांचा करारी व स्वाभिमानी बाणा,शब्दास पक्के आणि धिरगंभीरता हे गुण त्यांनी आयुष्यभर जोपासले होते.मात्र त्यांना सन-१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जवळच्या काहींनी धोका दिल्याने ते हादरले होते.त्यांना शेवटी काही असाध्य व्याधींनी गाठले होते त्यात त्यांचे दुर्दैवाने दि.२० जून २००४ रोजी निधन झाले होते.त्यांच्या स्वाभिमानी विचारांना तालुका अद्यापही विसरलेला नाही हे विशेष !त्यांची पुण्यतिथी आगामी २० जून रोजी संपन्न होत असून त्या निमित्त त्यांना विविध मान्यवर आदरांजली अर्पण करणार आहेत.
स्व.नामदेवराव परजणे यांच्या १९ व्या पुण्यस्मरणा निमित्त आगामी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात ह.भ.प.प्रशांत महाराज ताकोते यांचे,’युगधंर श्रीकृष्ण’ या विषयावर संपन्न झाले असून दि.१९ जून रोजी कु.कोमल बाळासाहेब पोळ यांचे,’देखणे ते जगणे’तर दि.२० जून रोजी प्राचार्य प्रदीप कदम सर यांचे,’प्रेरणा युवकांसाठी’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे.या कार्यक्रमांचा कोपरगाव तालुक्यातील भाविकांनी व कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी शेवटी केले आहे.