जगावेगळा हरींनाम सप्ताह
जो भगवंतासाठी रडतो त्याचे गीत तयार होते-महंत रामगिरीजी महाराज
सांगता समारोह कीर्तन
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
जो भगवंतासाठी रडतो त्याचे गीत तयार होत असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र कोकमठाण येथील किर्तन सेवेचे तिसरे पुष्प गुंफताना केले आहे.
“श्री क्षेत्र सराला बेटांत विश्वस्तांच्या वतीने बांधलेल्या डिसेंबर महिन्यात मंदिरात प्राण प्रतिष्ठा संपन्न होणार आहे त्यासाठी अडीच हजार जोडपे पूजेला बसवणार आहे.त्यासाठी सर्वांचे योगदान लागणार आहे.येणाऱ्या भाविकांनी दिलेल्या मानधन आम्ही मंदिराला लावला आहे.त्यासाठी कोट्यवधी सुमारे वीस कोटी रुपये खर्च झाला आहे.त्यासाठी देणगी पुस्तके देण्यात येतील त्यासाठी भाविकांनी देणगी द्यावी”-महंत रामगिरीजी महाराज,श्री क्षेत्र कोकमठाण ता.कोपरगाव.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याचा प्रत्यक्ष लाभ आठव्या व समाप्तीच्या दिवशीही लाखो भाविकानी घेतला आहे.त्यावेळी दुपारी साडे अकरा वाजता महंत रामगिरीजी महाराज यांनी आपले किर्तनाचे पुष्प गुंफले त्यावेळी ते बोलत होते.
महंत रामगिरीजी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची विरहिनी
“कृष्णे वेधली विरहिनी बोले,चंद्रमा करितो उबारे गे माये।।
“न लावा चंदनू न घाला विंजनवारा। हरिविणे शून्य शेजारू गे माये।।
माझे जिवीचे तुम्ही का वो नेणा।
माझा बळीया तो पंढरीराणा वो माये।।
नंदनंदनु घडीघडी आणा। तया वीण न वचती प्राण वो माये।
बाप रखमादेवीवरू विठ्ठलू गोविंदू। अमृतपानगे माये।।
अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला होता.
सदर प्रसंगी कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज,जनार्दन स्वामी विश्वस्त मंडळ,सस्वामी गिरीजनांद महाराज,तुषार भोसले,ओरिसाच्या खा.मंजूलता मंडल,माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,माजी मंत्री बबनराव घोलप,श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,कोकमठाण येथील परमानंद महाराज,सेवगिरीजी महाराज,माजी आ.स्नेहलता कोल्हे,बाळासाहेब मुरकुटे,विठ्ठल लंघे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,जंगली महाराज आश्रमाचे संत मंडळी,श्रीरामपूरच्या माजी सभापती वंदना मुरकुटे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छीन्द्र टेके,अनुसया होन,शिवाजी वक्ते,सुंदरगीरीजी महाराज,मधुकर महाराज,दशरथ महाराज उकिरडे,सराला बेटाचे विश्वस्त सचिन जगताप,वैजापूर येथील साबीरभाई खान,शिर्डी येथील संदीप पारख,कमलाकर कोते,बाळकृष्ण कापसे,बबनराव मुठे,बाळासाहेब चिडे,भाजप नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, राहाता नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा ममता पिपाडा,केशवराव भवर,सप्ताह समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम,कार्याध्यक्ष संभाजी रक्ताटे,शरद थोरात,संजीवनीचे संचालक बाळासाहेब वक्ते,सप्ताह समिती,सराला बेट विश्वस्त आदी प्रमुख मान्यवरांसह लाखो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.हि उपस्थिती तज्ज्ञांनी किमान साडेचार लाख असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”चंद्राच्या प्रकाशात पिवळेपणा आहे. परमात्म्याच्या शामलवर्ण आहे.रुक्मिणीने पांडुरंगाला पत्र लिहून त्याचे कौतुक केले त्याचा दृष्टांत दिला.भगवान कृष्णावर परस्त्रीयांची वस्त्रप्रावरने पळवली त्यावर आक्षेप घेतात तो निराधार असल्याचे त्यांनी सांगितले त्या भगवंत प्राप्त होण्यासाठी व्रत वैकल्य करत होत्या तर त्या परस्त्रीयां कशा असा उलट सवाल केला आहे.
सीता स्वयंवर होण्या आधी बागेत फिरताना भगवान रामाचे उदाहरण दिले व त्या स्त्रीयांचे चिरहरण करण्यासाठी केलेल्या त्या लीला असल्याचे विषद केले आहे.
सदर प्रसंगी रामगिरीजी महाराज यांनी सप्ताह समितीच्या कार्याचे कौतुक केले व संततधार पाऊस होऊनही भक्तांवर कुठलाही परिणाम झाला नाही आज पंढरपुरातील पांडुरंगाला सुद्धा करमणार नाही ते सुद्धा येथे आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.गोपी म्हणजे काय याचे विश्लेषण करताना त्या भगवंताला समर्पित असलेले आत्मे असल्याचे विश्लेषण केले आहे.आत्म्यात स्त्री-पुरुष हा भेद असत नाही.तो जन्म पश्चात निर्माण होतो. भगवंताच्या वेणूचा प्रभाव वर्णन करताना मिलनानुरागाचे उदाहरण दिले त्यावेळी ते म्हणाले की,”त्या वेणूने गायांच्या धारा वाहू लागल्या होत्या.पर्वताच्या वरून पाण्याच्या धारा वाहू लागल्या,वासरे आपल्या मातेला पिताना त्यांच्या तोंडातील दुधाचा घास खाली येऊ लागला असल्याचे रसाळ वर्णन केले आहे.गोपिणी आपल्या हातचे काम सोडून निघाल्या असल्याचे दिसून आले आहे.तयावेळी त्यांनी रासलीला म्हणजे काय ? याचे आपल्या अमोघ वाणीतून वर्णन करताना सूरदास महाराज यांचे रचनेचे सुंदर वर्णन व गायन केले आहे.काहीजण या घटनेचे विपर्यास करतात असा खेद व्यक्त करून त्यांनी ते प्रेम समजण्यासाठी जावे त्या वंशी तेंव्हा कळे असे सांगून टिकाकारांचा नेमका वेध घेतला आहे.जो भगवंतासाठी रडतो त्याचे गीत तयार होते.गोपी पाच हजार वर्षापूर्वी भगवंतासाठी रडल्या त्याचे गीत झाले.
सदर प्रसंगी श्री क्षेत्र सराला बेटांत विश्वस्तांच्या वतीने बांधलेल्या डिसेंबर महिन्यात मंदिरात प्राण प्रतिष्ठा संपन्न होणार आहे त्यासाठी अडीच हजार जोडपे पूजेला बसवणार आहे.त्यासाठी सर्वांचे योगदान लागणार आहे.येणाऱ्या भाविकांनी दिलेल्या मानधन आम्ही मंदिराला लावला आहे.त्यासाठी सुमारे वीस कोटी रुपये खर्च झाला आहे.त्यासाठी देणगी पुस्तके देण्यात येतील त्यासाठी भाविकांनी देणगी द्यावी असे आवाहन करून भाविकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.वर्तमानात त्यासाठी उसनवारी करण्यात आली असल्याची माहीती त्यांनी या प्रसंगी दिली आहे.
सदर प्रसंगी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले,आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.कोल्हे कुटूंबियांनी आळंदी आश्रमासाठी अकरा लाखांचा धनादेश महंत रामगिरीजी महाराज यांचे कडे प्रदान केला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दातेसंह अकरा अधिकारी त्यांच्या ७० सहकाऱ्यांनी व ७० पोलीस मित्र आदींनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आठ दिवस मोठे परिश्रम घेतल्याचे दिसून आले आहे.आज सकाळ पासून शिर्डीकडून येणारी व शिर्डीकडे जाणारी वाहतूक झगडेफाटा मार्गे वळविण्यात आली होती.ती सायंकाळी ५.३० वाजता सुरळीत झाली असल्याची माहिती हाती आली आहे.
किर्तन सेवेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला त्यावेळी कोकमठाण सप्ताह समितीच्या ०७ तर सराला बेट येथील ३ हजार असे एकूण १० हजार स्वयंसेवक कार्यरत होते.त्यासाठी ३०० ट्रॅक्टरच्या सहाय्याने काही मिनिटात काटेकोर नियोजन करण्यात आले होते.मात्र ऐन प्रसादाच्या वेळी पावसाने पल साधल्याने प्रसादा नंतर बाहेर पडताना भाविकांना मोठी यातायात करावी करावी लागली असताना दिसून आलेली आहे.निसरड्या रस्त्यावरून अनेकांना अनेक आबाल वृद्धांना त्रास सहन करावा लागला आहे.