जगावेगळा हरींनाम सप्ताह
सर्व जातीधर्मांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य संतात-महंत रामगिरीजी
न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सर्व जातीधर्मांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य संतात आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी आपल्या आयुष्यात हेच महान कार्य केल्याचे
प्रतिपादन साराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र कोकमठाण येथील किर्तन सेवेचे तिसरे पुष्प गुंफताना केले आहे.
“जोग महाराज व तुकाराम महाराज खेडलेकर आदी महाराजांना अध्यात्म मार्गाला लावण्याचे काम सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी केले आहे.पंढरपुरात त्यांनी सातशे पोते गाळून सप्ताह केला ते बैलगाडीने कुर्डुवाडी ते पंढरपूर हे पोते वाहिले होते.असा सप्ताह परत होईल की नाही शंका आहे.त्यामुळे वर्तमानात,”न भूतो सप्ताह”असे म्हणणे किती योग्य”-महंत राममगिरीजी महाराज,श्री क्षेत्र कोकमठाण.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला आहे.त्याचा प्रत्यक्ष लाभ सातव्या दिवशीही लाखो भाविकानी घेतला आहे.त्यावेळी दुपारी एक वाजता महंत रामगिरीजी महाराज यांनी आपले किर्तनाचे सातवे पुष्प गुंफले त्यावेळी ते बोलत होते.
महंत रामगिरीजी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा
“मोगरा फुलला, मोगरा फुलला ।
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला ।।
इवलेसे रोप लावियले द्वारी।
तयाचा वेलु गेला गगनावेरी ।।
मनाचिये गुंती गुंफियला शेला ।
बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला” ।।
अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला होता.
सदर प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,अण्णासाहेब म्हस्के,आ.सुधीर तांबे,श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,कोकमठाण येथील परमानंद महाराज,संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे,समाधान महाराज शर्मा,मेहुल संस्थान येथील सुधाकर महाराज,
,सेवगिरीजी महाराज,आ.लहू कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे,नगर जिल्हा परिषदेच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,संभाजी रक्ताटे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छीन्द्र टेके,शिवाजी वक्ते,रोहिदास होन,सुंदरगीरीजी महाराज,मधुकर महाराज,दशरथ महाराज उकिरडे,भाऊसाहेब महाराज मगर,संभाजी महाराज मगर,योगेश महाराज कांदळकर आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संत गंगागिरीजी महाराजांनी चारी वर्णासाठी अन्न छत्र उघडले होते.सर्व जातीधर्मांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य संतात आहे.जोग महाराजांना अध्यात्म मार्गाला लावण्याचे काम गंगागिरी महाराज यानी केले आहे.
त्यावेळी सप्ताह आयोजकांचे कौतुक व सप्ताहाचे गुणगान करताना ते म्हणाले,”पहिल्या दिवशी मिरवणुकीस दोन लाख भाविकांनी हजेरी लावल्याने सांगितले आहे.जोग महाराजांना अध्यात्म मार्गाला लावण्याचे काम सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी केले आहे.त्या ठिकाणी त्यांनी पंढरपुरात सातशे पोते गाळून सप्ताह केला ते बैलगाडीने कुर्डुवाडी ते पंढरपूर हे पोते वाहिले होते.असा सप्ताह परत होईल की नाही शंका आहे.त्यामुळे वर्तमानात,”न भूतो सप्ताह”असे म्हणणे किती योग्य असा सवाल केला आहे.तुकाराम महाराज खेडलेकर यांना ही त्यांनी परमार्थांस लावले होते.त्याआधी ते तमासगीर होते.त्यातून त्यांनी त्यांना किर्तनसेवेत घेतले. त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन परमार्थास लावले आहे.
या सप्ताहात आमटी खाल्ली की रोग होत नाही असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,” कबीर महाराजानी नऊ दरवाजाचा हा बंगला आहे.त्यात श्रवण इंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे.डोळ्याचे व कानाचे किती अंतर एका शिष्यास विचारले.व दोघांनी दोन उत्तरे दिले.उदाहरणांसाठी त्यांनी अश्वतथा म्याचे उदाहरण दिले आहे.
गुरू शिष्य परंपरा मोठी असून गुरू शिष्यास कानात मंत्र सांगतात कारण अयोग्य व्यक्तीने त्याचे ग्रहण करू नये ही त्यापाठीमागची भूमिका असते.शब्द शक्ती मोठी आहे.म्हणूनच शिवी दिल्यावर राग तर कौतुक केल्यावर गुदगुल्या होतात असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.श्रवण,स्पर्श शक्ती,प्रभावी असते तशी ईश्वराचे चिंतन केल्याने आत्मसाक्षात्कार व शांतीचा फायदा होतो.सद्गुरू शिष्याकडे चित्त मागतात.संसारात वित्त,परमार्थात चित्त लागते.
अंतःकरण हे शरीराचे सार आहे.
वाईट विचारांच्या माणसाशी संपर्क टाळावा.डॉ.बोस यांनी वनस्पतींना भावना असते तशी निर्जीव पदार्थामध्ये भावना नसते.सज्जन दुर्जनाच्या संगतीत राहिला तर त्याला दुर्गुण लागतात.विद्युत ऊर्जा कोणाला माफ करत नाही.ती अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत होते.स्पर्शाचा हा परिणाम आहे.सज्जनांचा स्पर्श हा चांगला आहे.दुर्जनांचा अधःपतनाला कारणीभूत होतो.
कासव आपल्या पिलाला दृष्टिद्वारे,मासा स
स्मरणाद्वारे पक्षी स्पर्शाद्वारे ऊर्जा देऊ शकते तर सद्गुरू आपली ऊर्जा आपल्या शिष्याला देऊ शकणार नाही का? असा सवाल विचारून सद्गुरूला शरण जाण्यास शेवटी सुचवले आहे.
“आजोबांचे बोट धरून या सप्ताहात आलो होतो.असेच अनुभव प्रत्येक भाविकांचे असतील.हा सप्ताह म्हणजे आत्मशुद्धीचे हे ठिकाण आहे.जातीभेदाच्या पलीकडे असणारे तत्वज्ञान आहे.सामान्य माणसाचा उद्धार करण्याचे हे पवित्र ठिकाण आहे.व आपले शिष्य परदेशात जावे अशी आमची अपेक्षा आहे”-बाळासाहेब थोरात,माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य.
त्यांनी आ.आशुतोष काळे यांनी ५१ लाख रुपये व १७५ पोते साखर तर माजी आ.कोल्हे यांनी ५१ लाख रुपये देणगी व १५० पोती साखर दिल्याचे सांगितले आहे.तर आ.थोरात यांनी स्वयंपाक गृहासाठी साहित्य,समारोपाला बाळासाहेब कापसे यांच्या वतीने ६०० पोते मुरमुरे दिले असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी परमानंद महाराज यांनी प्रास्तविक केले,तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,”आजोबांचे बोट धरून या सप्ताहात आलो होतो.असेच अनुभव प्रत्येक भाविकांचे असतील.हा सप्ताह म्हणजे आत्मशुद्धीचे हे ठिकाण आहे.जातीभेदाच्या पलीकडे असणारे तत्वज्ञान आहे.सामान्य माणसाचा उद्धार करण्याचे हे पवित्र ठिकाण आहे.व आपले शिष्य परदेशात जावे अशी आमची अपेक्षा आहे.पावसामुळे अडचण झाली तरी लाखो लोक येतात ही मोठी परंपरा आहे.पावसाने कृपा केली धरणे भरले ही त्या भगवंतांची कृपा असल्याचे प्रतिपादन केले आहे.
यां वेळी जंगली महाराज ट्रस्ट यांच्या विश्वस्तांच्या वतीने संत पूजन परमानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तर
या प्रवचन सेवेचे सूत्रसंचलन जयश्री पिंगळे मॅडम यांनी केले आहे.यावेळी मोठ्या संख्येने लाखों भाविक उपस्थित होते.या प्रवचन सेवेनंतर उपस्थित भाविकांना आत्मा मालिक संतपीठाचे वतीने सुमारे पन्नास लाख रुपये खर्चाच्या खिचडी प्रसादाचा लाभ दिला आहे.रात्री झालेल्या मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या पावसाने भाविकांना संचार करण्यास मोठ्या मर्यादा येत असल्याचे दिसून आले आहे.सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसून येत होते.
सप्ताह माहिती
प्रहराची माहिती-तीन तासाचे चार प्रहरे,यात प्रत्येक प्रहऱ्यात दीड ते दोन हजार भजनी असतात व उभे राहून भजन करतात.
प्रत्येक प्रहऱ्यात किमान अडीचशे गावातील भजनी असतात.हे प्रत्येक वर्षी स्वखर्चाने येतात.
यांना कुठलेही मानधन दिले जात नाही.
सदर ठिकाणी भारुड,कीर्तन,प्रवचन,अन्नदान आदी धार्मिक कार्याची प्रेरणा दिली जाते.
यातून सद्वर्तन,संतांच्या चरणी विश्वास वृद्धिंगत करणे,भक्तीप्रेम,सदाचार,दैवी गुणांचा विकास,मनाची सात्विक प्रवृत्ती वाढविणे,साधू संतांची चरित्रे त्यातून प्रेरणा घेणे आदी गुणांचा विकास केला जातो.
अन्नदान–
सप्ताह काळात आठ दिवस सर्वांना मुक्तद्वार भोजन प्रसाद दिला जातो.भाविकांनी अशी श्रद्धा आहे की,”या प्रसादाने अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात.या प्रसादात आमटी प्रसाद प्रसिद्ध.
या सेवेत परिसरातील हजारो गावे व तेथील श्रद्धाळू सहभाग घेतात.प्रसाद वाढण्यासाठी पंधरा ते वीस हजार तरुणांचा सहभाग व किमान १० हजार महिला सहभागी असतात.
प्रथम दिवशी पुरण पोळ्या मांडे,त्यासोबत दूध,आदी प्रसादाचा समावेश असतो.दुसरा ते सहाव्या दिवसापर्यंत आमटी व भाकरी प्रसाद असतो.त्यात आमटी सप्ताह ठिकाणी बनवली जाते.भाकरी गावोगावचे भाविक प्रसाद रूपाने जमा केली जाते.
शिर्डी येथील व्यापारी संदीप पारख यांचेसह त्या च्या तिघा बंधूंनी आळंदी आश्रमासाठी ०५ लक्ष तर आ.लहू कानडे व मित्र मंडळाने ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे.तर सप्ताहाची मागणी पुणतांबा,वैजापूर,वडाळा महादेव,डोंगरगाव येवला,निर्मळ पिंप्री,पिंपळगाव खुंटा, नेवासा घोडेगाव औद्योगिक वसाहत आदींसह ९ गावांनी मागणी केली आहे.
सप्ताह कालखंडात रात्रंदिवस सात दिवस प्रवचन,कीर्तन,अन्नदान आदी कार्यक्रम प्रामुख्याने होतात.यात गुणी जणांना व्यासपीठ संधी उपलब्ध करून दिली जाते.
एकादशीच्या दिवशी आज एकूण खिचडी सतरा हजार किलो शिजविण्यात आली असून ही दुपारी एक वाजेपर्यंत आकडेवारी आहे.