जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

धनादेश न वटल्याने आरोपीस सहा महिन्याचा कारावास

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    धनादेश न वटल्या प्रकरणी यातील निमगाव कोऱ्हाळे येथील आरोपी सत्यनारायण त्रिनाथ बेहरा यास कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकरी एम.ए.शिलार यांनी सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व ७० हजारांची रक्कम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.या प्रकरणी फिर्यादी सुनील गणेश रत्नपारखी यांनी समाधान व्यक्त केले आहे.यात फिर्यादीनुसार वतीने ऍड.बी.ए.सोनवणे यांनी काम पाहीले होते.

  कोपरगाव येथील रहिवासी व फिर्यादी सुनील रत्नपारखी यांचेबाबत घडली असून त्यांनी आरोपी मित्र असलेले इसम सत्यनारायण बेहरा यांना अडचणीचे काळी हात उसणी ०१ लाख २५ हजारांची रक्कम वेळोवेळी दिली होती.त्या पैकी रुपये ६० हजारांची रक्कम म्हणून एक धनादेश फिर्यादिस दिला होता.सदर धनादेश मात्र वटला नव्हता.त्यातून ही शिक्षा सुनावली आहे.

   चेकच्या वैधतेच्या कालावधीत दुसऱ्यांदा वा कितीही वेळा सादर केलेला चेक पास न झाल्यास फौजदारी खटला दाखल करता येतो,असा सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल आहे.सहीतील फरकामुळे वा अन्य कारणांनी चेक पास न झाल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम १३८ खाली खटला होऊ शकतो व दोषी व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास वा चेकच्या रकमेच्या दुप्पट रक्कमेपर्यंत दंड वा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.असा खटला दाखल करण्यापूर्वी चेक परत आल्यावर एक महिन्याच्या आत नोटीस द्यावी लागते व नोटीस दिल्यानंतर १५ दिवसाच्या आत पैसे चुकते केले नाहीत तरच खटला दाखल करता येतो.अशीच घटना कोपरगाव येथील रहिवासी व फिर्यादी सुनील रत्नपारखी यांचेबाबत घडली असून त्यांनी आरोपी मित्र असलेले इसम सत्यनारायण बेहरा यांना अडचणीचे काळी हात उसणी ०१ लाख २५ हजारांची रक्कम वेळोवेळी दिली होती.त्या पैकी रुपये ६० हजारांची रक्कम म्हणून एक धनादेश फिर्यादिस दिला होता.सदर धनादेश मात्र वटला नव्हता.सदर धनादेश न वटल्याने त्यांनी फिर्यादीस वारंवार याची जाणिव करून सदर रक्कम देण्यास विनंती केली होती.मात्र त्यांनी त्या प्रकरणी कानाडोळा केला होता.त्यामुळे नाराज होऊन फिर्यादी यांनी कोपरगाव येथील न्यायालयात ऍड.बी.ए.सोनवणे यांचे सहकार्याने फौजदारी खटला गुदरला होता.

   सदरचे कामकाज कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए.शीलार यांचे समोर सुरू होते.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाले आहे.त्यात आरोपी सत्यनारायण बेहरा हे दोषी आढळले होते.दोषसिध्द झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व ७० हजारांची रक्कम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.सदर नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्यास पंधरा दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणी फिर्यादी गणेश रत्नपारखी यांचे वतीने ऍड.बी.ए.सोनवणे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.त्यातून न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे.याबाबत फिर्यादिने समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close