जाहिरात-9423439946
ग्रामविकास

महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल व जवळके ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार दिनाक 05 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता जवळके आणि परिसरातील महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले असून या शिबिराचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात यांनी केले आहे.

“जवळके ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण व जवळके ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने “मोफत वैद्यकीय शिबिर” आयोजित केले असून त्यात महिलांचे रक्त तपासणी,रक्तदाब तपासणी,सह अनेक उपचार करण्यात येणार आहे”-इंदुबाई नवनाथ शिंदे,सदस्य,जवळके ग्रामपंचायत.

   राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जवळके गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम सुरू असून त्या अंतर्गत कोपरगाव पंचायत समिती यांचे मार्गदर्शनाखाली जवळके ग्रामपंचायत येथील हनुमान मंदिर सभामंडप येथे उद्या सोमवार दिनांक ०५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण व जवळके ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने “मोफत वैद्यकीय शिबिर” आयोजित केले असून त्यात महिलांचे रक्त तपासणी,रक्तदाब तपासणी,सह अनेक उपचार करण्यात येणार आहे.

   दरम्यान या शिबिरासाठी जवळके ग्रामपंचायत हद्दीतील अल्पबचत गट महिला सदस्य,शेतकरी,शेतमजूर आदी सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ कार्यकर्ते एस. के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई शिंदे,वनिता वाकचौरे,मीना थोरात,सोमनाथ थोरात,रोहिणी वाकचौरे,अरुण थोरात,गणेश थोरात आदी पदाधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे कार्यकर्तेआदी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close