ग्रामविकास
…या गावी ग्रामस्वच्छता अभियान उत्साहात

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
राज्याच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाची सुरुवात केली असून त्याची अंमलबजावणी कोपरगाव तालुक्यातील जवळके या ठिकाणी आज जवळके ग्रामपंचायत व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आज राबविण्यात आले आहे.त्याला ग्रामस्थ आणि विद्यार्थी आदींनी मोठा सहभाग नोंदवला आहे.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सदर प्रसंगी एम.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण व मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले बहादराबाद येथील तरूण अभिषेक मिनिनाथ जोंधळे यांचा जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे गमक सांगून प्रेरणा दिली आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे,त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे,शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे,योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका,सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे,यासाठी सन-२०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने यात सहभाग नोंदवला असून आपली विविध कामे मोठ्या उत्साहात सुरू केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज जवळके ग्रामपंचायत व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आज जवळके ग्रामपंचायत हद्दीत आज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,ह.भ.प.साईराम रहाणे,दत्तात्रय थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,अण्णासाहेब भोसले,के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन रहाणे,प्रा.अनिल गोर्डे,सुरेश गुंजाळ,चंद्रकांत वाघ,सोमेश्वर साबळे,मंगेश खंडिजोड,राहुल चीने,महिला प्रा.निकिता जोंधळे,वैशाली खरात,दिघे सुवर्णा,सुवर्णा औताडे,सागर भालेराव,डांगे मामा,ग्रामपंचायत सदस्य रखमा वाकचौरे,विजय रहाणे,जनार्दन थोरात,किरण जवरे,विजय शिंदे,एकनाथ थोरात आदीसह बहू संख्येने विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी आपले मनोगत नानासाहेब जवरे यांनी व्यक्त केले आहे.त्यांनी म्हटले आहे की,“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणी कार्यक्रमाची माहिती दिली असून ग्रामपंचायतने या पूर्वी जवळके आणि परिसरात एक ते सव्वा लाख वृक्षांची लागवड केली असल्याचे सांगून पंचायतीने या पूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,लोकराज्य ग्राम,माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे हस्ते वृक्ष लागवडीचा पुरस्कार आदी अनेक पुरस्कार पटकावले असल्याची माहिती दिली असून आगामी काळात मोठा निधी आणून विकास करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.जवळके ग्रामपंचायतीने अनेक ठराव करूनही सरकारने पंधराच्या वित्त आयोगाचा निधी गेल्या दिड दोन वर्षापासून अद्याप दिलेला नसल्याने कामे करणे अवघड झाले असल्याची माहिती दिली आहे.ग्रामपंचायत आगामी काळात वेगाने वाटचाल करील अन्य निधी आणून विकास करील असे आश्वासन दिले आहे.या पूर्वी शाळा खोल्या,अंगणवाडी इमारत,वृक्ष लागवड,अनेक रस्ते,वैयक्तिक विहिरी,घरकुले आदि कामे झाली असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक प्रा.अनिल गोर्डे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच सारिका थोरात यांनी मानले आहे.
सदर प्रसंगी एम.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण व मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले बहादराबाद येथील तरूण अभिषेक मिनिनाथ जोंधळे यांचा जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे गमक सांगून प्रेरणा दिली आहे.”आपण शाळांत परीक्षेत केवळ 54 टक्के गुण मिळवूनही जिद्दीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण झालो आहे.आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांत केवळ आत्मविश्वाची कमी असते.ती दूर केली की यश तुम्हाला दूर नाही असे शेवटी सांगितले आहे.



