ग्रामविकास
स्वच्छता अभियान राबविणाऱ्या संस्थेची ऐसी तैसी…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ग्रामस्वच्छता अभियानात त्याची अंमलबजावणी करण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची निर्णायक भूमिका असते आणि या संस्था या अभियानात चांगले आणि लक्षवेधी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देत असतात मात्र वर्तमानात कोपरगाव पंचायत समितीचे स्वच्छतागृहच अत्यंत गलिच्छ आणि दुर्गधी पसरणारे केंद्र बनले असून ही संस्थाच अस्वच्छतेचा बळी ठरून त्यांची ऐशी तैसी झाली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे तालुक्यातील सरपंच,कार्यकर्ते आणि ग्रामस्थानी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.या संस्थांवर कोणाचेव नियंत्रण असल्याचे दिसत नाही.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.तर आज श्री भगवान दत्त जयंती असल्याने बरेच अधिकारी आणि कर्मचारी या उत्सवात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
ग्रामस्वच्छता अभियान आणि स्वच्छता मोहीम म्हणजे गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम आहेत.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही महाराष्ट्र शासनाची एक प्रमुख मोहीम आहे,ज्याचा उद्देश गावातील घरांची,परिसराची आणि लोकांची स्वच्छता वाढवणे हा आहे.स्वच्छ भारत मिशनसारखे केंद्र शासनाचे कार्यक्रमदेखील या मोहिमांमध्ये समाविष्ट आहेत.संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशातून प्रेरणा घेऊन सर्वप्रथम तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी आपली काळात या मोहिमेचा शुभारंभ केला होता.त्याला राज्यात चांगली लोकप्रियता लाभली होती.त्यातून अनेक गावे स्वच्छ झाली हा अलीकडील काळातील इतिहास आहे.नंतर त्याचे अनुकरण करत केंद्राने पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत असून राज्य आणि केंद्र मिळून या मोहिमा राबवतात.या उपक्रमातून संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वच्छता,शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले जाते. त्यासाठी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी गावागावात जाऊन हा संदेश देऊन गावे स्वच्छ करताना दिसतात आणि पुरस्कार देताना दिसतात.मात्र वर्तमान काळात पंचायती समिती परिसर आणि त्यांचे स्वच्छता गृह हा दुर्गंधीचे आगर बनले असल्याचे दिसून येत आहे.या पूर्वीही आमच्या प्रतिनिधीने पंचायत समिती,तहसील कार्यालय परिसरात असलेले कचऱ्याचे ढीग निदर्शनास आणून दिले होते.एकदा तर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी स्वच्छता मोहिम राबवली होती.त्यानंतर अधिकाऱ्यांची पळापळ होऊन त्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवली होती.आता स्वच्छतागृहात तर कोणालाही जाऊन पश्चाताप करण्या पलिकडे काहीही हाती येणार नाही अशी विदारक स्थिती आहे.

दरम्यान एका माहितीनुसार या साठी पंचायत समीतीसाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा निधी येत आहे.मग स्वच्छता का केली जात नाही ? असा सवाल निर्माण झाला आहे.या प्रश्नात राजकीय नेत्यांना वेळ मिळाला तर बरे नाही तर पंचायत समितीची दुर्गंधी लवकरच तालुक्यातून तहसील कचेरीत येणाऱ्या नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने आत प्रवेश केला असता नाक दाबून घ्यावे लागले अशी स्थिती आढळून आली आहे.वर्तमान काळात लोकप्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीत गुंतले असल्याचे त्यांना त्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे दिसून येत आहे.अधिकाऱ्यांना त्याकडे पहावयास सवड असल्याचे दिसत नाही.याबाबत आमच्या प्रतिनिधीने गटविकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात गाठविण्याचा प्रयत्न केला असता त्या कार्यालयात कोणी ही आढळून आले नाही,साहेब बाहेर गेले असल्याचे साचेबंद उत्तर मिळाले आहे.त्यामुळे पंचायत समितीत स्वच्छता ठेवण्यासाठी निधी नाही की त्यासाठी कर्मचारी नाही असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.दरम्यान एका माहितीनुसार या साठी पंचायत समीतीसाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा निधी येत आहे.मग स्वच्छता का केली जात नाही ? असा सवाल निर्माण झाला आहे.या प्रश्नात राजकीय नेत्यांना वेळ मिळाला तर बरे नाही तर पंचायत समितीची दुर्गंधी लवकरच तालुक्यातून तहसील कचेरीत येणाऱ्या नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे.सरकारने पंचायत समितीसाठी कोट्यवधी रुपयांची मोठी इमारत बांधूनही तिची स्वच्छतेअभावी वाट लागली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या स्वच्छतागृहाशेजारी कार्यालये असलेले कर्मचारी वैतागले असल्याचे दिसून येत आहे.त्या ठिकाणी वापरलेल्या अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून येत आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.तर आज श्री भगवान दत्त जयंती असल्याने बरेच अधिकारी आणि कर्मचारी या उत्सवात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.



