ग्रामविकास
…या ग्रामपंचायतीला निधी कमी पडू देणार नाही-खा.वाकचौरे

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांना आपण मोठा निधी दिला असून आगामी काळातही आपण निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी जवळके येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे.

अंगणवाडी इमारतीसाठी दिड आर जमीन दान करणारे दाते स्व.साईनाथ रामचंद्र थोरात,यांचे वतीने भाऊसाहेब थोरात,कानिफनाथ थोरात तर शाळेसाठी पर्यायी व्यवस्थेसाठी मदत करणारे गणेश सुकदेव थोरात,मच्छिंद्र सुकदेव थोरात,जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीसाठी आपली एक आर जमीन दान करणारे दाते नामदेव तुकाराम थोरात आदींचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कौतुक केले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्ग खोल्या,११.२५ लाख रुपयांची अंगणवाडी इमारत निधी मंजूर झाला त्याचे भुमिपूजन समारंभ व बहादराबाद फाटा ते ओस पांढरी या १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचा उद्घाटन समारंभ खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभ हस्ते आज रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला होता.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक मुकुंद सिनगर हे होते.

“निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे यांनी आपल्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तीन वर्ग खोल्या,एक अंगणवाडी,एक रस्ता आदी कामे मार्गी लावली आहे.आगामी काळात हे गाव सोलरग्राम करण्यासह विविध कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.उर्वरित शाळा खोल्यासाठी नानासाहेब जवरे यांचे मार्फत आमच्या मागे लकडा सुरूच राहणार असून ते विविध निधी मार्फत पूर्ण करणार आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,कोपरगाव सेनेचे तालुकाप्रमुख गंगाधर रहाणे,उपसरपंच विजय थोरात,अण्णासाहेब भोसले,डी.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र रोहम,मुख्याध्यापक पावसे,बहादराबाद सरपंच विक्रम पाचोरे,शहापूर माजी सरपंच गणपतराव पाचोरे,बहादराबाद ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नरहरी पाचोरे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,पोलिस पाटील सुधीर थोरात,अरुण थोरात,अशोक शिंदे,संतोष थोरात,शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी अंबिलवादे मॅडम,शाळा समितीचे माजी अध्यक्ष संदीप थोरात,नवनाथ शिंदे,विजय शिंदे आदीसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

“जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सौर गिरणी,सोलर हिटर,सी.सी.टी.व्हि.गावाचे प्रवेशद्वार आदी अनेक ठराव मंजूर केले आहे.मात्र गेल्या एक दिड वर्षापासून सरकार १५ व्या वित्त आयोगाचा निधी वर्ग करत नसल्याने कामांना अपेक्षित गती येत नाही,त्यासाठी खा.वाकचौरे यांनी संसदेत प्रयत्न करावे”-नानासाहेब जवरे,प्रदेश प्रसिध्दी प्रमुख,शेतकरी संघटना.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जवळके ग्रामपंचायत ही प्रगतीपथावरील ग्रामपंचायत असून या आधी या ग्रामपंचायतीने जवळके आणि परिसरातील रस्त्यांच्या कडेला सव्वा लाखांहून अधिक वृक्षलागवड करून साई पालख्यांना आणि साईभक्ताना दिलासा दिला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार,लोकराज्य ग्राम पुरस्कार,वनराईचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री स्व.मोहन धारिया यांच्या हस्ते पुरस्कार पटकावला आहे.निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे यांनी आपल्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तीन वर्ग खोल्या,एक अंगणवाडी,एक रस्ता आदी कामे मार्गी लावली आहे.आगामी काळात हे गाव सोलरग्राम करण्यासह विविध कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.उर्वरित शाळा खोल्यासाठी नानासाहेब जवरे यांचे मार्फत आमच्या मागे लकडा सुरूच राहणार आहे.त्यांनी आमच्या मागे लागून दिल्लीतून निळवंडे धरणासाठी १७ पैकी १४ मान्यता मिळवल्या होत्या.त्यामुळे कालव्यांचे काम करण्यासाठी मोठी मदत झाली होती.त्यांनी सर्व गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले,मात्र त्यांचीच गावे पाण्यापासून वंचित आहे हे दुर्दैव आहे.त्यासाठी आवश्यक मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.तत्पूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या तीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन,अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन,बहादराबाद फाटा ते जुने देवगाव या रस्त्याचे उद्घाटन केले आहे.

यावेळी प्रास्ताविक पत्रकार नानासाहेब जवरे यांनी केले त्यावेळी त्यांनी,”जवळके ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस.के.थोरात यांच्या मदतीने सरपंच सारिका विजय थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सौर गिरणी,सोलर हीटर,सी.सी.टी.व्हि.गावाचे प्रवेशद्वार आदी अनेक ठराव मंजूर केले आहे.मात्र गेल्या एक दिड वर्षापासून सरकार १५ व्या वित्त आयोगाचा निधी वर्ग करत नसल्याने कामांना गती येत नसल्याचा खेद व्यक्त केला आहे.व खा.वाकचौरे यांनी लोकसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात झगडेफाटा ते वडगाव पान,जवळके मार्गे शिर्डी हा पालखी मार्ग,आदींसाठी सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी केलेल्या निधीतून आर्थिक तरतूद करून या प्रश्नासह शेतीचे गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित करावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान यावेळी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेनेचे तालुकाप्रमुख गंगाधर रहाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी उपसरपंच विजय थोरात यांनी मानले आहे.



