ग्रामविकास
ग्रामसभा ठराव नाकारणाऱ्यांवर कारवाई करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील ग्रामपंचायतने घेतलेला ग्रामसभा ठराव बेकायदा असून त्याची चौकशी करावी व दोषी विरूध्द कारवाई करावी अशी मागणी आज आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या जनता दरबारात आज शरद पवार युवा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वर्पे यांनी केली आहे.त्यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी मात्र हा तांत्रिक मुद्दा असून त्यावर तक्रार करा चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे दुष्काळी ग्रामस्थांचे या निर्णयाकडे लक्ष लागून रहिले आहे.

दरम्यान यावेळी संवत्सर येथील रहिवासी महिला शीतल बाळासाहेब परजणे यांनी शिंगणापूर हद्दीत तीन आर.अकृषक जमीन खरेदी केली असताना त्याला काही असंबधित नागरिक नाहक त्रास देत असल्याची माहिती दिली व त्याबाबत त्याची तहसीलदार कोपरगाव,प्रांत शिर्डी,अपर जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी होऊन आपल्या बाजूने निकाल असताना काही असामाजिक तत्व जमिनीचा ताबा घेऊ देत नसल्याची गंभीर तक्रार केली आहे.मात्र कहर तर तेंव्हा झाला तहसीलदार महेश सावंत यांनी,”सदर क्षेत्र हे अकृषक नाही”त्यावेळी जागेवरच शीतल परजणे यांनी पुरावे दिल्याने अनेकांना अवाक होण्याची वेळ आली.
कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या शिवाय या दुष्काळी गावांना पिण्याचे आरक्षण पडलेले नाही.शिवाय पायाभूत सेवा सुविधा पासून हा भाग अद्याप स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटूनही वंचित आहे.परिणामी रांजणगाव देशमुख येथील संतापलेल्या ग्रामस्थानी मागील महिन्यात 17 सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत आम्हाला राहाता अथवा संगमनेर तालुक्यात सवाविष्ट करावे असा ग्रामसभेचा ठराव बहुमताने मंजूर केल्याने कोपरगावसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्यावर आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी,” सदर ठराव मंजूर झाला असल्याचे सांगून तटस्थ मते ग्रामसभेत विचारात घेतली जात नाही” असा थेट खुलासा केला होता.त्यामुळे तो ठराव हा 21 विरूध्द 05 मतांनी मंजूर झाला होता हे उघड झाले होते.त्यामुळे आज आ.काळे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात याचे पडसाद उमटणार अशी अटकळ बांधली जात होती.ती खरी ठरली असून आज तक्रारदार सुनील वर्पे यांनी या प्रकरणी दाद मागितली होती.
सदर प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक अनिल कदम,राहुल रोहमारे,दिलीप बोरनारे,प्रशांत घुले,शंकर चव्हाण,दिनार कुदळे,श्रावण आसने,गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक राजेंद्र निकोले,रामदास केकाण,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन रोहमारे,गटविकास अधिकारी संदीप दळवी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप, लघुपाटबंधारे विभागाचे उपनिबंधक संतोष दळवी,पंडित वाघिरे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, अभियंता आर.टी.दिघे,पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रद्धा काटे,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,शाखा अभियंता सी.डी.लाटे,आरोग्य विकास अधिकारी एम.एस.पथवे,कृषी अधिकारी सचिन कोष्टी,गणेश सोनवणे,ग्रामसेवक,सरपंच,सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी राजंणगाव देशमुख येथील प्रश्नावर उत्तर देताना म्हंटले आहे की,”ही बाब तांत्रिक असल्याचे स्पष्ट करून त्या बाबत लेखी तक्रार करावी त्याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण दिले असल्याची माहिती वर्पे यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान यावेळी संवत्सर येथील रहिवासी महिला शीतल बाळासाहेब परजणे यांनी शिंगणापूर हद्दीत तीन आर.अकृषक जमीन खरेदी केली असताना त्याला काही असंबधित नागरिक नाहक त्रास देत असल्याची माहिती दिली होती व त्याबाबत त्याची तहसीलदार कोपरगाव,प्रांत शिर्डी,अपर जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी होऊन आपल्या बाजूने निकाल असताना काही असामाजिक तत्व जमिनीचा ताबा घेऊ देत नसल्याची गंभीर तक्रार केली आहे.दरम्यान यात महसूल विभाग मदत करत नसल्याची तक्रार आ.आशुतोष काळे यांचे समोर केली असता आ.काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.त्यांनी,सदर तीन आर.जमीन अकृषक नसल्याची बतावणी केली होती.त्यावेळी तक्रारदार महिला शीतल परजणे यांनी लगेच आपल्याकडील निकाल आणि अकृषक केल्याचे पुरावे जनता दरबारात सादर केल्याने तहसीलदार सावंत यांची पंचाईत झाली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी त्यांना फैलावर घेऊन सदर नोंद घेऊन त्यांना संरक्षण देऊन जमिनीचा ताबा द्यावा असा आदेश दिला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार सावंत यांचेशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.त्यामुळे तहसीलदार या प्रश्र्नी काय कारवाई करणार हे समजले नाही.
या वेळी खरीप हंगामाची पिके काढण्याची कामे जोरात सुरू असल्याने व हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली असल्याचे जनता दरबारात उपस्थिती कमी होती.तरीही उपस्थित नागरिकांनी आपले प्रश्न मांडले आहे.ज्या नागरीकांनी प्रश्न मांडले त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न,भूमिगत गटारींचा प्रश्न,घरकुल,ग्रामसेवक उपस्थित राहत नाही,घंटा गाडी बंद असल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीग साचले,घरकुलाला वाळू मिळत नाही,पशु संवर्धन विभागाकडून शासनाच्या लाभाच्या योजना नागरीकांपर्यंत पोहोचत नाही,जिल्हा परिषदेतील शिक्षक सातत्याने गैरहजर असतात,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार दिला जातो अशा अनेक समस्या नागरिकांनी या जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्या पुढे मांडल्या असता त्यांनी त्याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला त्याचा खुलासा करण्याचे सांगून त्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी आ.काळे यांनी नागरिकांच्या घरकुलासाठी वाळू उपलब्ध व्हावी यासाठी १२०० ब्रास वाळू राखीव ठेवण्याबाबत तहसीलदार महेश सावंत यांना सूचना केल्या आहेत. ज्या गावातील खराब रस्त्यांचे व भूमिगत गटारींचे प्रश्न आहेत त्यासाठी त्या रस्त्यांचे व गटारींचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव पाठवा त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.कोपरगाव तालुक्याला ६०८० घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होते परंतु त्यापैकी २२०० लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम सुरु आहे त्यामुळे उर्वरित घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे काम सुरु करावे जेणेकरून पुढील यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणे सोपे होईल.राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुलासाठी आवश्यक मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी संगितले.तसेच मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित झाले नसल्याचे काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.त्यामुळे एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.