ग्रामविकास
आठ ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी निधी मंजूर-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधीसाठी महायुती शासनाने दखल घेवून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी रु. १ कोटी १५ लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही,अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या प्रचलित धोरणात सुधारणा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी,सुरेगाव,घारी,घोयेगाव व पढेगाव या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा समावेश असून कोळपेवाडी,सुरेगाव,पढेगाव या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी प्रत्येकी २५ लाख तर घारी,घोयेगाव या ग्रामपंचायत कार्यालयासाठी प्रत्येकी २० लाख असा एकूण ०१ कोटी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.त्याबद्दल कोळपेवाडी,सुरेगाव,घारी,घोयेगाव व पढेगाव या गावातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी ०१ कोटी १५ लाख निधी दिल्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहे.