ग्रामविकास
पुरस्कारासाठी मतभेद बाजुला ठेऊन काम करण्याची गरज -…यांचे आवाहन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
राज्य शासनाने ग्रामविकास व पंचयतराज विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान “हाती घेतले असून या अभियानात संवत्सर ग्रामपंचायत राज्यस्तरावर अव्वलस्थानी येण्यासाठी ग्रामस्थांनी राजकीय मतभेद,गट तट बाजुला ठेऊन एकोप्याने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“संवत्सर ग्रामपंचायतीने दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचें मार्गदर्शनाखाली जलसंवर्धनाबरोबरच वृक्षारोपण,रस्ते,वीज,शिक्षण,घरकुले,स्वच्छ पाणी पुरवठा,स्वच्छतागृहे,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ग्रामविकासाची बहुतांशी कामे परिसरात राबविलेली आहेत.गावाला यापूर्वी शासनाची पारितोषीकेही प्राप्त झालेली आहेत”-सुलोचना ढेपले,सरपंच,संवत्सर ग्रामपंचायत.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायतीच्यावतीने “मुख्यामंत्री समृध्द पंचायतराज अभियान” विषेश कार्यशाळेचे आज सकाळी ८.३० वाजता आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री परजणे बोलत होते.
सदर प्रसंगी सरपंच सुलोचना ढेपले,पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंडितराव वाघेरे,कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेव साबळे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रध्दा काटे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ओंकार दिघे,ग्रामपंचायत अधिकारी कृष्णदास आहिरे,ग्राम महसूल अधिकारी श्रीमती वाडेकर,डॉ.घोरपडे,लक्ष्मणराव साबळे,दिलीप ढेपले,चंद्रकांत लोखंडे,सोमनाथ निरगुडे,शंकररराव परजणे,लक्ष्मणराव परजणे,ग्रामपंचायत सदस्य तुषार बारहाते,सदस्य महेश परजणे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,बाबुराव मैद,बाळासाहेव दहे,ज्ञानदेव गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,मुकुंद काळे,गणेश साबळे,खंडू फेपाळे यांच्यासह ग्रामस्थ,महिला,प्राथमिक आरोग्य केंद्राचे पदाधिकारी,ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी सन-२०२५- २६ या आर्थिक वर्षापासून तालुका,जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर हे अभियान राबविण्यास मंजुरी दिलेली आहे.या अभियानासाठी राज्यासाठी सुमारे २९० कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ कोटी.विभागीय स्तरासाठी १ कोटी,जिल्हास्तरासाठी ५० लाख,तालुकास्तरासाठी १५ लाख तर विशेष पुरस्कार ५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप ठेवण्यात आलेले आहे असे सांगून श्री परजणे पाटील पुढे म्हणाले की,”संवत्सर ग्रामपंचायतीने जलसंवर्धनाबरोबरच वृक्षारोपण,रस्ते,वीज,शिक्षण,घरकुले,स्वच्छ पाणी पुरवठा,स्वच्छतागृहे,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ग्रामविकासाची बहुतांशी कामे परिसरात राबविलेली आहेत.गावाला यापूर्वी शासनाची पारितोषीकेही प्राप्त झालेली आहेत.ग्रामस्थांना त्यांच्या मुलभूत व आवश्यक गरजा पुरविण्यात संवत्सर ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील राहिलेली आहे.भविष्यातही गावाचा अधिकाधीक विकास होण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानात संवत्सर ग्रामपंचायत सहभाग घेणार आहे.
शासनाने हाती घेतलेल्या या अभियानातून ग्रामीण भागात आर्थिक समृध्दी पोहोचेल,गावाला विकासाची नवी उर्जा मिळेल आणि गावाची समृध्दीकडे वाटचाल होईल.लोकसहभाग या मुख्य उद्देशाबरोबरच लोकाभिमूख प्रशासन,नागरी सेवा सुविधा केंद्रांना सेवा केंद्रांचा दर्जा देणे,तक्रार निवारण,ग्रामपंचायत वेबसाईट,सीसीटीव्ही कॅमेरे,दप्तर व लेखे अद्ययावतीकरण,मतदार नागरीक ॲप डाऊनलोड करणे,आयुषमान भारत कार्ड वितरीत करणे,कर आणि पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करणे,स्व -उत्पन्न वाढविणे,पिण्याचे शुध्द पाणी पुरविणे,नळपाणी योजना सक्षम करणे,स्ट्रीटलाईट थकबाकी शुन्य करणे,पंतप्रधान आवासची कामे पुढे नेणे,सर्व शासकीय संस्थांनी लोकसहभागासाठी प्रयत्न करणे अशा विविध विकास कामांचे गुणांकन या अभियानातून शासन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करुन घेणार असल्याचे सांगून परजणे यांनी संवत्सर ग्रामपंचायत गुणांकनामध्ये पात्र ठरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासकीय यंत्रनेसोबत समन्वय साधून काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्रारंभी उपसरपंच विवेक परजणे यांनी प्रास्ताविक केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या अभियानाबाबतचे लाईव्ह टेलिकास्ट भाषण याप्रसंगी दाखविण्यात आले. उपस्थितांचे आभार
दिलीप ढेपले यांनी मानले आहे.



