ग्रामविकास
आदर्शगांव योजनेसाठी…या गावाची दखल घ्या-सूतोवाच

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रस्ते,पिण्याचे पाणी,सार्वजनिक स्वच्छता,सांडपाण्याची व्यवस्था,आरोग्य व शिक्षण यांसारख्या पायाभूत योजना राबविण्यात येत आहेत.शासनदेश निघण्यापूर्वीच संवत्सर गावात मात्र त्या योजना आधीच राबविण्यात आल्याचे दिसून येत असल्याने अशा गावाची आदर्श गांव म्हणून शासनस्तरावरुन दखल घेतली जावी असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आजची शिक्षणपध्दती ही पारंपारिक पध्दतीतून पुढे जात असताना नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधने,प्रकल्पाधारित शिक्षण,फ्लिप क्लासरुम यासारख्या आधुनिक पध्दतीचा वापर करणाऱ्या शाळांची संख्याही वाढत आहे ही कौतुकास्पद बाब आहे”-आनंद भंडारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,अहील्यानगर.
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,खत प्रकल्प,महंत राजधवाया प्राणवासू स्मृतीवन,दहा गुंठे जागेतील तीन हजार मियांवाकी वृक्ष लागवड प्रकल्पांची पाहणी तसेच जिल्हा परिषद शाळेमधील नवनवीन प्रकल्पांच्या पाहणीबरोबरच,शाळेचे प्रवेशद्वार व सिमेंट रस्ते,भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम आझाद सायन्स पार्क,मुख्याध्यापक कार्यालय व संवादकक्ष,नवीन शाळा खोल्या,वाचनालय व संगणक कक्ष,नवीन क्रीडांगण आदी प्रकल्पांचे उद्घाटन तसेच मल्टिपर्पज (बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन असे अनेक) कार्यक्रम संपन झाले. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आनंद भंडारी हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे या होत्या.

सदर प्रसंगी संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक,उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल शेळके,जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले,कार्यकारी अभियंता बाळासाहेव नन्नवरे,सरपंच सुलोचना बेपले,पत्रकार ज्ञानेश दुधाडे व अशोक निंवाळकर,लक्ष्मणराव साबळे,खंडू फेपाळे,चंद्रकांत लोखंडे,दिलीप ढेपले,राजेंद्र ढेपले,लक्ष्मणराव परजणे,सोमनाथ निरगुडे,संजय भाकरे,भरत बोरनारे,सतीश शेटे,पंढरीनाथ आबक,शंकरराव परजणे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,माणिकराव भाकरे,बाळासाहेब गायकवाड,सूर्यभान परजणे,धिरज देवतरसे,निवृत्ती लोखंडे,बाळासाहेब दहे,शांताराम परजणे,हवीब तांबोळी,नामदेव पावडे,कैलास भाकरे, अर्जुन तांबे,सुभाष बिडवे,अरविंद आचारी,बापुसाहेब गायकवाड,भाऊसाहेब कर्पे,सोमनाथ घेर,मोहन ढेपले,गणेश डरांगे,भालचंद्र भामरे,रमेश भोकरे,संजय भाकरे,गणपत रानोडे,दत्तात्रय शेटे,परिमल कोद्रे,बबन परजणे,तुषार वारहाते,लक्ष्मण बोरनारे,महेश परजणे,जालिंदर रोहोम,मधुकर शेटे,सुधाकर परजणे,चारुदत्त गायकवाड,भरत साबळे,दत्तात्रय परजणे,जाकीर शेख यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी,पदाधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा अहिरे,ग्रामस्थ उपस्थित होते.

संवत्सर गावात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात आलेली विकास कामे ही नव्या क्रांतीला दिशा देणारी आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यासाठी संवत्सर हे गांव दिशादर्शक ठरावे अशी दिशादर्शक वाटचाल या गावाने सुरु ठेवलेली आहे.इथली कामे पाहून आपण थक्क झालो आहोत.माझ्या गावातील सरपंचासह शिष्टमंडळ संवत्सरला भेट देण्यासाठी घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त करुन आनंद भंडारी यांनी शाळेतील नवनवीन प्रकल्पाचे कौतुक केले.आजची शिक्षणपध्दती ही पारंपारिक पध्दतीतून पुढे जात असताना नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधने,प्रकल्पाधारित शिक्षण,फ्लिप क्लासरुम यासारख्या आधुनिक पध्दतीचा वापर करणाऱ्या शाळांची संख्याही वाढत आहे.त्यात संवत्सर येथील जिल्हा परिषदेची शाळा नवीन तंत्रज्ञानाच्याही पुढे वाटचाल करीत असल्याचेही भंडारी शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी उपस्थितांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक आदींनी आपले मनोगते व्यक्त केली आहे.
दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर उपसरपंच विवेक परजणे पाटील यांनी प्रास्ताविक केले आहे,शाळेचे मुख्याध्यापक फैयाज खान पठाण यांनी पाहुण्यांना शाळेतील विविध प्रकल्पांविषयी माहिती दिलीआहे तर पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी आभार व्यक्त केले आहे.



