जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम !

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातही वारी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी दिलिप वारकर हे नुकताच आपल्या ३६ वर्षे प्रदीर्घ सेवेचा कार्यकाल पूर्ण करून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आगामी रविवार दि.२० जुलै रोजी कोपरगाव बेट येथील भक्तनिवास येथे सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असल्याची माहिती तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष जालिंदर पाडेकर यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी दिलीप वारकर.

   

ग्रामपंचायत अधिकारी दिलीप वारकर हे प्रामाणिक आणि आपल्या कठोर कर्तव्यनिष्ठेसाठी ते सर्व ठिकाणी ओळखले जात होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
  अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत.बऱ्याच वर्षापासून आळंदी,पंढरपुर वारीतील सहभाग लक्षवेधी असतो.

  ग्रामपंचायत अधिकारी दिलिप वारकर हे १९८९ या वर्षी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद या गावी ग्रामसेवक म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली होती.तर कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत येथे त्यांची सेवापूर्ती होत आहे.सेवा कालावधित त्यांनी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद,वरशिंदे, वरवंडी,कोलेवाडी,श्रीरामपुर तालुक्यातील खैरी निमगाव,कोपरगाव तालुक्यातील टाकळी, चांदेकसारे,घारी,शिंगणापुर आणि वारी या ग्रामपंचायत मध्ये आपली सेवा चोख बजावली होती.आपल्या कठोर कर्तव्यनिष्ठेसाठी ते सर्व ठिकाणी ओळखले जात होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
  अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत.बऱ्याच वर्षापासून आळंदी,पंढरपुर वारीतील सहभाग लक्षवेधी असतो.

  त्यांच्या सेवा निवृत्ती बाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,राहाता पंचायत समिती गटविकास अधिकारी पंडित वाघेरे,कोपरगाव पंचायत समिती उपअभियंता श्री.दळवी,सी.डी.लाटे,पंचायत समिती विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,प्रशांत तोरवणे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close