जाहिरात-9423439946
ग्रामविकास

भरकटत चाललेल्या पिढीला संस्काराची गरज-थोरात

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे.साधू-संतांनी समाजाला अध्यात्माचा चांगला मार्ग दाखवला.आजच्या नवीन भरकटत चाललेल्या पिढीला संस्कृती व संस्कार टिकण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाणे ही काळाची नितांत गरज बनली आहे.यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आज बालकांचे संस्कार शिबिर सुरू केले असून याचा बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी उपअभियंता एस.के.थोरात यांनी नुकतेच जवळके येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

“माणसाचे विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.त्या संस्कारामुळे विद्यार्थी आपले घर,गाव,राज्य आणि देश घडवितात याचे देशात छत्रपती शिवाजी महाराज,माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम,साने गुरुजी आदी अनेक उदाहरणे आहेत”-एस.के.थोरात,माजी उपअभियंता,जलसंपदा विभाग.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार.गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे.मनन करून,सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव.विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.त्या संस्कारामुळे विद्यार्थी आपले घर,गाव,राज्य आणि देश घडवितात याचे देशात छत्रपती शिवाजी महाराज,माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम,साने गुरुजी आदी अनेक उदाहरणे आहेत.त्याचे महत्व ओळखून जवळके ग्रामपंचायत व जनमंगल ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे बाल संस्कार प्रशिक्षण शिबिर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक बापूराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बंडू थोरात हे होते.

  

“पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत,त्यांना दररोज वंदन करत.जेवण्यापूर्वी श्‍लोक म्हणत.सायंकाळ होताच हात-पाय धुऊन देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्रे म्हणत.रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत.अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत”-बंडू थोरात,माजी सरपंच,जवळके ग्रामपंचायत.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,भाऊसाहेब थोरात,सखाहारी थोरात,नानासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,रामनाथ थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,संतोष वाकचौरे,एकनाथ थोरात,गोरक्षनाथ थोरात,रामनाथ थोरात,परशराम शिंदे,विजय शिंदे,संभाजी घुमरे,गणेश कानडे आदिसंह बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे बाल संस्कार प्रशिक्षण शिबिर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक बापूराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले त्यावेळी त्यांचा सत्कार संतोष वाकचौरे गुरुजी यांनी केला आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृती संस्कारयुक्त असली पाहिजे.प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे,उदा.केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती.केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती.दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे.मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्याला ‘आई-वडिलांना रोज नमस्कार कर’, ‘दुसऱ्याची निंदा करू नको’ इत्यादी शिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे तर तत्त्वज्ञान सांगून नाही,गोष्टी सांगून नाही,चॉकलेट,आईस्क्रिमची लाच देऊन नाही तर आपल्या कृतीने.आपण इकडे जाणीवपूर्वक कृती केली तर आपल्या मागे आपली मुले तशी कृती करतात.छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते.आपणही आदर्श बनलो,तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शेवटी केले आहे.

“जवळके ग्रामपंचायत व जनमंगल संस्थेने सुरु केलेल्या शिबिरात शिक्षण घेणारे विद्यार्थी;आगामी काळात अगदी लहान मुले-मुली भजन,कीर्तन,हरिपाठ,पसायदान,गायन करताना बघून अनेकजण चकीत होतील असा आशावाद वाटतो”-बापूराव थोरात सर.माजी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक,जवळके.

   सदर प्रसंगी बोलताना माजी सरपंच बंडू थोरात म्हणाले की,”पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत,त्यांना दररोज वंदन करत.जेवण्यापूर्वी श्‍लोक म्हणत.सायंकाळ होताच हात-पाय धुऊन देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्रे म्हणत.रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत.अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत.मुलांनो,तुम्हाला आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांनी ओळखावे,असे वाटत नाही का ? आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्ही गुणी व्हायला हवे.चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि म्हणून आदर्श व्हाल असे आव्हान करून विद्यार्थ्यांना बालवयातच सांप्रदायिक शिक्षण देणे आवश्यक असल्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली आहे.विद्यार्थी हा यामध्ये रममान होण्यास वेळ लागत नाही.यातून अनेक व्यायामाचा सराव नकळत होत असतो.त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी शक्यतो येत नाहीत असे सांगून त्यांनी या शिबीरात बालकांना आपल्या पालकांनी सामील करावे असे आवाहन बंडू थोरात यांनी शेवटी केले आहे.

   सदर प्रसंगी बापूसाहेब थोरात सर म्हणाले की,”आधुनिक युगात अनेक खेळ,साहित्य,मनोरंजनासाठी टी.व्ही.संगणक आदी उपलब्ध झालेले आहेत.अनेक विद्यार्थी हे टी.व्ही.चित्रपट व व्हिडीओ गेम यात व्यस्त झालेले दिसतात; परंतु या शिबिरात शिक्षण घेणारे विद्यार्थी;आगामी काळात अगदी लहान मुले-मुली भजन,कीर्तन,हरिपाठ,पसायदान,गायन करताना बघून अनेकजण चकीत होतील असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय थोरात यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार गोरक्षनाथ थोरात यांनी मानले आहे.या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close