ग्रामविकास
….ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम शिबिर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जवळके ग्रामपंचायत व अश्विन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व कोपरगाव तहसील अंतर्गत तालुका पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विविध उपक्रम शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते त्यात रेशन कार्ड मधील नाव कमी करणे,ऑनलाईन करणे,नाव दाखल करणे,फाटलेले दुबार रेशन कार्ड,संजय गांधी निराधार योजना,विभक्त रेशन कार्ड आदी कामांचे १०७ अर्ज दाखल करून घेतले असून श्रावण बाळ योजना,भूमिहीन शेतमजूर पेन्शन योजना आदी कामे करण्यासाठी अर्ज दाखल केले असल्याने जवळके ग्रामस्थानीं या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

अश्विन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर तर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने रेशन कार्ड संबंधी शिबिराचे आयोजन केले होते त्याचा शुभारंभ केला तो प्रसंग.
दरम्यान सदर शिबीरासाठी तहसीलदार संदीपकुमार भोसले,पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार,डॉ.शिवपाल खंडीझोड,प्रताप फरताळे,पराग खंडीझोड,सेतू संचालक संजय थोरात,कानिफनाथ थोरात,ग्रामसेवक सतीष दिघे,थोरात कामगार तलाठी किशोर गटकल,सागर नरोडे,आशासेविका वंदना थोरात आदींचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले होते.
जवळके ग्रामपंचायत अंतर्गत नूकतेच सत्ता परिवर्तन झाले असून आहे नवीन पदाधिकारी व सदस्य यांनी नुकतेच अश्विन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते तर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने रेशन कार्ड संबंधी विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते त्याला मोठा प्रतीसाद लाभला आहे.

सदर प्रसंगी शिबिराचे उदघाटन जेष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ थोरात यांच्या हस्ते हनुमान मंदिरात नारळ वाढवून सुरुवात केली आहे.सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,माजी उपअभियंता एस.के.थोरात,पूरवठा निरीक्षक महादेव कुंभार,डॉ.शिवपाल खंडीझोड,माजी सरपंच वसंत थोरात,दत्तात्रय थोरात,सरपंच सारिका थोरात,उपसरपंच सुनील थोरात,विजय थोरात,बाबासाहेब थोरात,जनमंगल संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,सोमनाथ थोरात,मिना थोरात,इंदूबाई शिंदे,वनिता वाकचौरे,रोहिणी वाकचौरे,अरुण थोरात,गणेश थोरात,संतोष थोरात,ज्ञानदेव थोरात,वेणूनाथ थोरात,श्रीहरी थोरात,सखाहारी थोरात,नवनाथ शिंदे,रामनाथ थोरात,लक्ष्मण थोरात,डॉ.दिनेश पानगव्हाणे,निशांत इंगळे,तेजस्विनी इंगळे,ज्योती खंडारे आदिसंह बहुसंख्य डॉक्टर,ग्रामसेवक सतीश दिघे,परिचारिका,आशासेविका वंदना थोरात,आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान सदर शिबीरासाठी तहसीलदार संदीपकुमार भोसले,पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार,डॉ.शिवपाल खंडीझोड,प्रताप फरताळे,पराग खंडीझोड,सेतू संचालक संजय थोरात,कानिफनाथ थोरात,ग्रामसेवक सतीश दिघे,थोरात कामगार तलाठी किशोर गटकल,सागर नरोडे,आशासेविका वंदना थोरात आदींचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी तर उपस्थितांना मार्गदर्शन डॉ.शिवपाल खंडीझोड,पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांनी मार्गदर्शन केले आहे.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ०५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो.योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलीकृत रुग्णालयांद्वारे ०५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जाणार आहे.देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार असल्याने या प्रसंगी पाच लाखांच्या गोल्डन कार्डचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले आहे.सुत्रसंचलन उपसरपंच सुनील थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय थोरात यांनी मानले आहे.