ग्रामविकास
ग्रामपंचायत इमारतीला प्रशासकीय मान्यता-… यांची माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना सेवा मिळावी या उद्देशातून महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लौकी,शहापूर,सोनारी,चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीच्या कामाला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.
त्यात लौकी,शहापूर,सोनारी,चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
लौकी शहापूर,सोनारी,चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.