गृह विभाग
कोपरगाव शहरातील…या पोलीस अधिकाऱ्यांची बदली
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नुकतीच नाशिक जिल्ह्यात बदली झाली आहे.त्यांची नियोजित पोलीस ठाण्याची जागा अद्याप निश्चित नसली तरी ती लवकरच जाहीर होणार आहे.त्यांच्या जागी येणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्यांचेकडे दि.२० फेब्रुवारी पर्यंत कार्यभार राहणार आहे.
एरव्ही पोलीस आणि महसूल विभागाबाबत फारसे चांगले बोलले जात नाही मात्र पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या कार्यकाळात चोरट्यांवर मोठा धाक निर्माण केला होता.या शिवाय त्यांनी आपल्या चोख कर्तव्याने व शिस्तीने जनतेत विश्वास निर्माण केला होता.त्यामुळे तालुक्यात त्यांचा सर्वत्र आदरयुक्त धाक होता.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विश्वासाला ते पात्र होते.त्यांच्या काळात आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून तालुका पोलीस ठाण्यास नवी जागा आणि इमारत यासाठी २८.५० कोटी निधी मंजूर होण्याचे मोठे काम झाले होते.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कर्जत येथून दोन वर्षापूर्वी दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी हजर झाले होते.त्यांच्या काळात आपेगाव येथील वृद्ध शेतकरी पती-पत्नीचे दुहेरी हत्याकांड घडले होते.त्याचा तपास पोलीस अधिकारी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोवीस तासात लावला होता.व आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.
ओगदी ग्रामपंचायत हद्दीत दि.०९ जानेवारी २०२१ पहाटे १.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय-४५) यांचे वस्तीवर दरोडा दरवाजावर दगडांचा भडिमार करून तो तोडला व घरातील ५० हजार रुपये रोख,जवळपास सहा तोळे सोन्या-चांदीचे विविध दागिने असा ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला असून महिलेला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केली असल्याचा गुन्हा घडला होता.
दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या भाऊसाहेब पंढरीनाथ इंगळे यांच्या घरी आज दि.०६ मे रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी घराची तोडून चाकूचा व एअरगनचा धाक दाखवून त्यांच्या घरातील विविध दागिने,रोख रक्कम असा सुमारे ०३ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला हा गुन्हा गाजला होता.
त्यानंतर नागपूर आणि नगर-मनमाड मार्गावर होणाऱ्या रस्ता लुटी बाबतही त्यांनी तपास लावला होता.व नुकतेच त्यांनी पढेगाव आणि अन्य ठिकाणचे चार ट्रॅक्टर चोरीतील संगमनेर तालुक्यातील कनोली येथील दोन आरोपी नुकतेच पकडले होते.
एरव्ही पोलीस आणि महसूल विभागाबाबत फारसे चांगले बोलले जात नाही मात्र पोलिस निरीक्षक जाधव यांनी आपल्या कार्यकाळात चोरट्यांवर मोठा धाक निर्माण केला होता.या शिवाय त्यांनी आपल्या चोख कर्तव्याने व शिस्तीने जनतेत विश्वास निर्माण केला होता.त्यामुळे तालुक्यात त्यांचा सर्वत्र आदरयुक्त धाक होता.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विश्वासाला ते पात्र होते.त्यांच्या काळात आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून तालुका पोलीस ठाण्यास (आहे त्या जागी पालिकेकडून)नवी जागा आणि इमारत आदींसाठी २८.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचे मोठे काम झाले होते.ते केवळ व व्यासपीठावर जाऊन भाषणे ठोकणारे पुढारी छाप अधिकारी नव्हते त्यांची कथनी आणि करणी एक असल्याने ते जनतेच्या आदराला पात्र झाले हॊते.त्यांच्यात गुन्हेदर कमी दाखविण्यासाठी गुन्हे दडपणे आणि नोंदवून न घेण्याचे व बातम्या न येण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना धमकावण्याचे पातक आमच्या प्रतिनिधीस कधी आढळले नाही.त्यांच्या कार्यकाळात कनिष्ठ अधिकारी सुरेश आव्हाड,सहाय्यक फौजदार,नाईक,हे.कॉ.,कनिष्ठ कर्मचारी यांनी पोलिसांची आणि पोलीस ठाण्याची प्रतिमा उंचावली होती.त्यांच्या काळात एकही वादग्रस्त घटना घडली नव्हती.कोपरगाव तालुक्यातील पुढारी आणि कार्यकर्ते यांच्या नसा माहिती होत्या.त्यामुळे लाळघोटे पुढारी आणि कार्यकर्तेही त्यांना टरकुन रहात असत.त्याचा नमुना त्यांनी कर्जत या ठिकाणी दाखवून दिला होताच यावेळी त्याचे केवळ स्मरण इतकेच.