गृह विभाग
…’तो’ अखेर सेवानिवृत्त झाला …!
न्यूजसेवा
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी हे श्री साईबाबां मूळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे दररोज हजारोच्या संख्येने व उत्सव काळात लाखोच्या संख्येने साईभक्त येत असतात .त्यामुळे येथे साई मंदिर व साई भक्तांची व ग्रामस्थांची सुरक्षा महत्त्वाची समजली जाते.त्यासाठी येथे सर्व सुरक्षा यंत्रणा सातत्याने सज्ज असते.अशाच सुरक्षेच्या ताब्यामध्ये बॉम्बशोधक पथकातील पोलीस यंत्रणेचा( डॉग) श्वान वर्धन येथे कार्यरत होता.
श्री साईबाबा मंदिरासह मंदिर परिसरामध्ये पोलिस यंत्रणेमार्फत बॉम्ब शोध पथकामध्ये सुरक्षा तपासणी करणारा “वर्धन” नुकताच आपल्या या शासकीय सेवेतून सेवा निवृत्त झाला आहे.वर्धन हा प्रशिक्षित असा बॉम्ब शोधक पथकातील श्वान आहे.तो बॉम्बशोधक पथकामध्ये पोलिसांबरोबर येथे काम करत होता.अनेक दिवस त्याने साई मंदिर व परिसरात आपली चोख ड्युटी बजावली होती.मात्र तो आता आपल्या या आपल्या कर्तव्यात सेवानिवृत्त झाला आहे.वर्धन सेवानिवृत्त झाला त्यामुळे त्याचा शाल टाकून सत्कारही करण्यात आला हे विशेष !
यावेळी आजपासून आपण परत मंदिरात येऊ शकणार नाही.याचे दुःख वर्धनच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत असल्याची माहिती नजीकच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्याचा नुकताच येथे सन्मान करण्यात आला.त्यावेळी आपसुकच त्याचे डोळे भरून आले आणि त्याला आपल्या मित्राप्रमाणे,पोरासारखं,आपल्या नातलगासारखं व आपल्या कर्तव्यातील बरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्याप्रमाणे जपणारे या पथकातील पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्याही डोळ्यात अश्रू काही क्षण आले होते.
तो जरी सेवानिवृत्त झाला मात्र त्याची आठवण बॉम्ब शोध पथकातील पोलीस कर्मचारी तसेच शिर्डीतील साईभक्त,ग्रामस्थ यांनाही कायम नक्कीच राहील असे बोलले जात होते.