गृह विभाग
अशांतता पसरवणाऱ्यांना तडीपार करणार-पोलीस अधीक्षक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रत्येक समाजातील धार्मिक स्थळांवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवून तेथे सुरक्षा रक्षक व पुजारी हे त्या ठिकाणी असणे गरजेचे असून समाजात अनेक विघातक कृत्य करणारे यांना चाप बसणे आवश्यक आहे.तसेच समाजिक शांतता राखण्याचे काम हे समाजातील सर्व घटकांचे असून समाजात अशांतता पसरवणाऱ्यांना लवकरच तडीपार करणार असून दोन्ही समाजात तणाव निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी कोपरगाव येथे एका बैठकीत बोलताना केले आहे.
कोपरगावची परंपरा एकोप्याची आहे.ती कायम ठेवावी.शांतता प्रस्थापित करावी.शहर व तालुक्यात निर्माण झालेले वाद आपसात मिटले जावेत.गावचे वातावरण बिघडविणारांवर कारवाई व्हावी.धर्मग्रंथ विटंबना प्रकरणात दोषीला अटक झाली पाहिजे.कोपरगाव शहरात गोहत्या बंद झाली पाहिजे”-कोपरगाव नागरिक.
कोपरगाव शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा,धार्मिक ग्रंथांची विटंबना त्यानंतर होत असलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेला तणाव पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने कोपरगाव शहरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,तहसीलदार संदीपकुमार भोसले,उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगरसेवक कैलास जाधव,बबलू वाणी,मेहमूद सय्यद,सुनील फंड,जितेंद्र रणशूर,कृष्णा आढाव,शैलेश साबळे,मंदार पहाडे,विशाल निकम,अनिरुद्ध काळे,अनिल गायकवाड,रवींद्र पाठक,विजय वाजे,स्वप्नील निखाडे,दत्ता काले,अकबर शेख,शफिक सय्यद,असलम शेख आदीसह मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कोपरगावची परंपरा एकोप्याची आहे.ती कायम ठेवावी.शांतता प्रस्थापित करावी.शहर व तालुक्यात निर्माण झालेले वाद आपसात मिटले जावेत.गावचे वातावरण बिघडविणारांवर कारवाई व्हावी.धर्मग्रंथ विटंबना प्रकरणात दोषीला अटक झाली पाहिजे.कोपरगाव शहरात गोहत्या बंद झाली पाहिजे” अशा भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
सदर प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी गोहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.समाजकंटकांची यादी तयार आहे.गुंडांच्या तडीपारचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत असे सांगून पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की,”एखादा गुन्हा घडला की ५०-१०० लोक एकत्र येऊन पोलीस ठाण्यासमोर जमतात ही चांगली गोष्ट नाही.जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.सामाजिक संकेतस्थळावर व्यक्त होताना काळजी घेतली पाहिजे.आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी तालुक्यातील पालकांना केले आहे.
धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्यास लवकरात लवकर अटक करावी-आ.आशुतोष काळे
घडलेल्या प्रकरणांची चौकशी करून शिक्षा व्हावी,कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच कोणत्याही धर्माची विटंबना होऊ नये तसेंच प्रत्येक धर्मात वाईट प्रवृत्ती आहेत त्यामुळे सरसकट धर्माला व सर्वांना दोषी धरून त्यांना वाईट म्हणणं चुकीचं आहे.बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्यास लवकरात लवकर अटक करावी,सर्व नागरिकांनी जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,समाजकंटकांपासून सावध रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
हिंदूंच्या भावनांचा उद्रेक होण्यास अनेक कारणे-वहाडणे
हिंदू जन आक्रोश मोर्चा नंतर शहराचे वातावरण बिघडले असा आरोप केला जातो.परंतु हा आरोप चुकीचा आहे.एका मुलीच्या धर्मांतरानंतर मोर्चा निघाला नाही.वीस मुली हिंदूंच्या गायब झाल्यानंतर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता.याशिवाय शहरात गोहत्या राजरोसपणे सुरू आहे.यावर प्रशासनाचा अंकुश नाही.धर्मग्रंथाची विटंबना हा प्रकार निषेधार्ह आहे.या प्रकरणानंतर जी आंदोलने झाली,त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. परंतु अ.नगर शहरात शिवरायांची विटंबना झाली,तेव्हा मात्र एकाने त्या गोष्टीचा निषेध केला नाही,असे परखड मत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.