क्रीडा विभाग
बॅडमिंटन स्पर्धेत कोपरगावातील…या शाळेचे लक्षवेधी यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व अ.नगर येथील जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करत सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडीच्या मुलींच्या संघाने लक्षवेधी यश मिळवत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे या यशामुळे विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे व व्यवस्थापनातील पदाधिकारी यांच्या मदतीचे हे यश असल्याचे मानले जात आहे.
सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख श्री एजाज व त्यांची पूर्ण टीम जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिल्ले,विशाल गर्जे मिलिंद कुलकर्णी तसेच प्राचार्या सुनीता पारे,पर्यवेक्षक श्री खळदकर सर आणि सोमैय्या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका यांचेही मार्गदर्शन लाभले होते.
दरम्यान सर्व खेळाडूंना प्रशिक्षक संजय अमोलिक सर अनेक वर्षापासून रोज दोन सत्रांत बॅडमिंटन,टेबल टेनिस,क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण देत आहेत परिणामस्वरूप हे यश प्राप्त झाले असल्याची माहिती प्रकशिक्षक संजय अमोलिक यांनी दिली आहे.