जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

जिल्हा क्रीडास्पर्धेत…या शाळेची लक्षवेधी कामगिरी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा २०२५–२६ मध्ये कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जिल्हा क्रीडास्पर्धेत…या शाळेची लक्षवेधी कामगिरी करत सर्वाधिक बक्षिसे पटकाविण्याचा मान मिळवला असल्याची माहिती हाती आली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जिल्हा क्रीडास्पर्धेत बहादरपुर येथील शाळेने लक्षवेधी कामगिरी केली तो क्षण.

 

दरम्यान या स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी सार्थक नानासाहेब गव्हाणे याने वैयक्तिक क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्याने १०० मीटर धावणे,लांब उडी व उंच उडी या प्रकारांत जिल्ह्यात प्रथम,तर थाळीफेक या क्रीडाप्रकारात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.दरम्यान या विद्यार्थ्यांना निवृत्ती बढे,लक्ष्मण पंडोरे,शरद आहेर,लांडगे मॅडम,मसुते मॅडम,गावित मॅडम,भिवसन मॅडम तसेच रामदास गव्हाणे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात आयोजित केल्या जातात.या स्पर्धांमध्ये कबड्डी,खो-खो,ऍथलेटिक्स (मैदानी खेळ) आणि सांघिक खेळांचा समावेश असतो.हे उपक्रम विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी,निरोगी स्पर्धा भावना रुजवण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरतात.असाच स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.त्यात कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बहादरपुर येथील शाळेने ही यश संपादन केले आहे.

दरम्यान या स्पर्धेत मोठा गट-कबड्डी (मुले व मुली) या क्रीडाप्रकारात बहादरपूर शाळेच्या संघांनी चांगले सांघिक खेळाचे प्रदर्शन केले आहे.मुलांच्या संघाने जामखेड संघाविरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

   दरम्यान मुलींच्या संघाने श्रीरामपूर संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात जिद्द,संघभावना व कौशल्य दाखवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तसेच लहान गटातील मुलींनी कबड्डी या क्रीडाप्रकारात लक्षवेधी खेळ करत जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे.

  दरम्यान या स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी सार्थक नानासाहेब गव्हाणे याने वैयक्तिक क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्याने १०० मीटर धावणे,लांब उडी व उंच उडी या प्रकारांत जिल्ह्यात प्रथम,तर थाळीफेक या क्रीडाप्रकारात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

   दरम्यान या यशाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,केंद्रप्रमुख विलास भांड,मुख्याध्यापक चंद्रकांत डोंगरे,तसेच शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ,बहादरपूर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
  दरम्यान या विद्यार्थ्यांना निवृत्ती बढे,लक्ष्मण पंडोरे,शरद आहेर,लांडगे मॅडम,मसुते मॅडम,गावित मॅडम,भिवसन मॅडम तसेच रामदास गव्हाणे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close