क्रीडा विभाग
माजी आ.रोहमारे यांचे स्मरणार्थ स्पर्धांचे आयोजन ही भूषणावह बाब-..यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याचे माजी जिल्ह्याचे भूषण आ.स्व.के.बी. रोहमारे यांच्या स्मरणार्थ खुल्या बॅडमिटन स्पर्धा आयोजित करणे ही बाब भूषणावह असून त्यांच्या कार्याचे स्मरण या निमित्ताने होत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन केले त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव येथील के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या वतीने व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांचे आयोजनाखाली माजी आ.स्व.के.बी. रोहमारे यांचे स्मरणार्थ खुल्या बॅडमिटन स्पर्धा उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे होते.

सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे,राहुल रोहमारे,शिर्डी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश कोते,बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बोरा,माजी नगरसेवक दिनार कुदळे,सुधाकर होन,प्राचार्य विजय ठाणगे,उपप्राचार्य बाळासाहेब सोनवणे,अभिजित नाईकवाडे,अनुप कातकडे,स्मिता संदीप रोहमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Bसदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप रोहमारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार क्रीडाप्रमुख प्रा.सुनील कुटे यांनी मानले आहे.



