जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

राष्ट्रीय शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   
   पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘६९ व्या राष्ट्रीय शालेय १७ वर्षाखालील मुलींची कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन’ माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ माजी खा.डॉ.सुजय विखे यांचे हस्ते पार पडला तो क्षण.

  

“खेळातून संघभावना,परस्पर सन्मान,पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजय संयमाने पचवण्याची शिकवण मिळते.राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अभिमानाची बाब असून,त्यांनी या संधीचे सोने करून दाखवावे”- खा.डॉ.सुजय विखे.

   पुणे येथील राज्य शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ०९. वाजता माजी खा.डॉ.सुजय विखे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

    सदर प्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट तसेच साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,यावेळी व्यासपीठावर आत्मा मलिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रभाकर जमधडे,जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे सर्व क्रीडाधिकारी व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.

   

   या प्रसंगी आत्मा मलिक एनडीए अकॅडमीची विद्यार्थिनी कु.कावेरी घोलप व कु.संजीवनी मोगरे यांची भारतीय वायुसेनेत निवड झाल्या त्याबद्दल त्यांचे कुटुंबीयां समवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

   या वेळी स्पर्धेसाठी देशभरातून ३३ संघांनी सहभाग नोंदविला असून २८ डिसेंबर पर्यंत या स्पर्धा पार पडणार आहेत यावेळी विद्यार्थिनींनी पारंपारिक औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले आयोजक संस्थेच्या वतीने त्यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला.त्यानंतर मशाल फेरीद्वारे स्पर्धेचे अधिकृत सुरुवात करण्यात आली व उद्घाटन सोहळ्यात या ३३ संघानी अहिल्यानगरच्या पोलीस बँडच्या तालावर सुंदर क्रीडा संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली आहे.आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी नृत्यविष्कार सादर करून पाहुण्यांची व उपस्थिततांची मने जिंकली असल्याचे दिसून आले आहे.

   यावेळी महाराष्ट्र संघाची कर्णधार कु.आरती खांडेकर हिने खेळाडूंना शपथ दिली तसेच या प्रसंगी आत्मा मलिक एनडीए अकॅडमीची विद्यार्थिनी कु.कावेरी घोलप व कु.संजीवनी मोगरे यांची भारतीय वायुसेनेत निवड झाल्या त्याबद्दल त्यांचे कुटुंबीयां समवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

     यावेळी माजी खा.डॉ.विखे म्हणाले की,”खेळातून संघभावना,परस्पर सन्मान,पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजय संयमाने पचवण्याची शिकवण मिळते.राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अभिमानाची बाब असून,या संधीचे सोने करून दाखवावे असे आवाहन त्यांनी केले.साईबाबांच्या पावन भूमीत आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करताना,अशा राष्ट्रीय स्पर्धांमधून देशाला भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील,असा विश्वास  व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून,खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील,स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांचे अभिनंदन केले आहे.

  यावेळी पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाठ म्हणाले की,”कबड्डी हा केवळ शारीरिक ताकतीचा खेळ नसून तो शिस्त संयम आणि संघ भावनेचा खेळ आहे.या स्पर्धेत खेळताना विजयाबरोबरच खेळातील प्रामाणिकपणा मेहनत आणि खिलाडू वृत्ती महत्त्वाची आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

   आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज म्हटले की,”ध्यान ही फक्त साधना नसून ती विद्यार्थ्यांच्या अंतकरणातील शक्ती जागृत करणारे प्रक्रिया आहे. ध्यानामुळे एकाग्रता संयम व आत्मविश्वास वाढतो जो खेळाडूसाठी अत्यंत आवश्यक आहे.खेळ हा केवळ शरीराचा व्यायाम नसून आत्मशक्तीचा अविष्कार आहे.ध्यान शिस्त आणि सात्विक जीवनशैली यांच्या माध्यमातून भारतातील खेळाडू जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्वल करतील असे महाराजांनी शेवटी नमूद केले आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   सदर प्रसंगी पंचप्रमुख बळीराम सातपुते,जिल्हा कबड्डी संघटना सहसचिव विजय मिस्कीन,आश्रमचे वरिष्ठ व्यवस्थापक हिरामण कोल्हे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वस्तीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मिरा पटेल,कबड्डी फेडरेशनचे स्पर्धानिरीक्षक पंकज त्रिवेदी,सर्व प्राचार्य आदीनि कार्यक्रमासाठी नियोजन केले होते.

   यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले तर सूत्रसंचालन निरंजन डांगे,अजय देसाई यांनी केले पाहुण्यांचे आभार क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांनी मांनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close