क्रीडा विभाग
…या विद्यार्थ्याची शालेय व्हॉलीबॉल संघात निवड

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आयन खलील खान याने राज्यस्तरीय निवड चाचण्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र शालेय व्हॉलीबॉल संघात (19 वर्षे गट) निवड झाली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्याच्या निवडीनंतर मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आयन खलील खान याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
गोंदिया येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागांमधील १५० व्हॉलीबॉलपटू सहभागी झाले होते.त्यापैकी १२ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये आयन खलील खानचा समावेश आहे.यानंतर मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आयन खलील खान याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.
आयनच्या या दैद्यमान यशाबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे,प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज,संदीपकुमार भोसले,प्रज्ञा महांडुळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.यावेळी संस्थानच्या नावलौकिकात भर घातल्या बद्दल आयनच्या आई-वडिल खलील खान व नाझेरा खान यांच्यासह आयनचा सत्कार करण्यात आला आहे.आयन खलील खान यास क्रीडा प्रशिक्षक कैलास शेळके व राजेंद्र कोहोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.



