क्रीडा विभाग
…या शहराला लवकरच मिळणार क्रीडा संकुल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सन२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघासाठी दिलेल्या आश्वासनाकडे कोपरगाव शहरात क्रीडा संकुलाचा प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर शहराचे राज्य सरकारने क्रीडा संकुल मंजूर केले होते.मात्र ते खिर्डी गणेश हद्दीत पळवले गेले असल्याचा आरोप तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे आदींनी सातत्याने केले होते.मात्र तत्कालीन भाजपत प्रवेश कर्ते झालेले व भाजप लाटेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नव्हती.
यापूर्वी कोपरगाव तालुक्यात सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर शहराचे राज्य सरकारने क्रीडा संकुल मंजूर केले होते.मात्र ते खिर्डी गणेश हद्दीत पळवले गेले असल्याचा आरोप तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे आदींनी सातत्याने केले होते.मात्र तत्कालीन भाजपत प्रवेश कर्ते झालेले व भाजप लाटेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नव्हती.केवळ आपल्या संस्थेची शैक्षणिक सोय पाहीली होती.परिणामी शहरातील नागरिकांचा भ्रमनिरास झाला होता.व त्यानंतर सातत्याने क्रीडा संकुलांची मागणी खेळाडूंकडून सुरू होती.दरम्यान या मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
सदर बैठकीसाठी क्रीडा मंत्री माणिक कोकाटे तसेच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता,राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे,डॉ.राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.दूरदृश्य प्रणालीद्वारे आ.काळे,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नागरगोजे,जिल्हा क्रीडाधिकारी खुरांगे सहभागी झाले होते.लवकरच सर्वाजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या समवेत प्रस्तावित जागेची पाहणी करून आराखडा करण्यात येणार असल्याची माहिती आ.काळे यांनी शेवटी दिली आहे.