क्रीडा विभाग
…या ठिकाणी क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आमदार क्रीडा महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

फुटबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने पोहेगाव संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.क्रिकेट स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव संघाचा ७ विकेट राखून पराभव केला. हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने संभाजीनगर संघाचा पेनल्टी स्ट्रोक मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.
सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, शाळेचे प्राचार्य नूर शेख,विविध खेळाडू प्रशिक्षक,संघ व्यवस्थापक,पंच,शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,चैताली काळे आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
स्पर्धेदरम्यान सहभागी सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी महाराष्ट्र हॉकी क्रीडा संघटनेचे सेक्रेटरी अजीज सय्यद,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे,के.एन. केला हायस्कूलचे प्राचार्य रघुनाथ गायकवाड आदी मान्यवरांनी आमदार क्रीडा महोत्सवास भेट दिली आहे.

सदर क्रीडा महोत्सवात राज्यातील नाशिक, संभाजीनगर,अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील हॉकी, क्रिकेट, फुटबॉल व हॉलीबॉल मुली अशा एकूण २० संघानी सहभाग घेतला.फुटबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने पोहेगाव संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.क्रिकेट स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव संघाचा ७ विकेट राखून पराभव केला. हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने संभाजीनगर संघाचा पेनल्टी स्ट्रोक मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलचा सरळ सेट मध्ये २५-१७, २३-२५ व २५-२१ असा पराभव केला.
क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण मीरा भाईंदर नवघर चे पोलीस उपायुक्त सोहेल शेख यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना सोहेल शेख म्हणाले की,गौतम पब्लिक स्कूल नेहमीच उदयोन्मुख खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. शाळेच्या मातीने अनेक खेळाडूंना घडवले असल्याबद्दलचे गौरवोद्गार यावेळी शेख यांनी काढले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, सर्व हाऊस मास्टर शिक्षक वृंद आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.
सदर उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविकरेखा जाधव यांनी केले.पंच म्हणून अकबर खान,रिजवान शेख,जावेद शेख,सुधाकर निलक,रमेश पटारे,राजेंद्र आढाव, इसाक सय्यद,दानिश शेख,श्रेया पटारे आदींनी काम पाहिले.