क्रीडा विभाग
देशात…हे खेळाडु घडवण्यासाठी योग्य वातावरण-माहिती
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
बेसबॉल खेळाचा प्रसार,प्रसार हा अमेरिका आणि पश्चात देशात अगोदर झाला असला तरी आता भारतात आता व प्रचार करायचा आहे.चांगले खेळाडु तयार करायचे आहे.त्यासाठी वर्तमानात आता चांगले वातावरण असल्याचे प्रतिपादन ‘डायमंड ड्रीम अॕकेडमी’चे सीईओ कनवल सरा यांनी नुकतेच केले एका कार्यक्रम प्रसंगी केले आहे.
संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेज,संजीवनी विद्यापीठ कोपरगांव येथे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन,अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल असोसिएशन व संजीवनी विद्यापीठ,कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते त्याप्रसंगी ते हे बोलत होते.
सदर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अमित कोल्हे,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन’चे सचिव राजेंद्र इखणकर,अशोक सरोदे,इंद्रजित नितीनवार,बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे,सचिव मकरंद कोऱ्हाळकर,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
सदर प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले की,”१८ व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये आधीच जुने बॅट-अँड-बॉल गेम खेळले गेले आहे.बेसबॉल हा खेळ अमेरिकेत आणला गेला,त्यामुळे आधुनिक आवृत्ती विकसित झाली.१९ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत बेसबॉल या खेळाला राष्ट्रीय क्रीडा म्हणून ओळखले गेले.बेसबॉल हा खेळ उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,कॅरिबियन आणि पूर्व आशियातील काही भाग विशेषतः जपान आणि दक्षिण कोरियामध्ये लोकप्रिय आहे.मात्र अलीकडील काळात तो भारताची लोकप्रिय होत आहे ही समाधानाची बाब आहे,लवकरच या बाबतीत स्पर्धेचे वेळापत्रक तयार करु व त्या प्रमाणे शिबिर व स्पर्धा आयोजित करु असेही ते शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी शिबिरासाठी विलियम ख्राईस्ट फ्रान्सिस्कस जूनियर,डायरेक्टर
डायमंड ड्रीम्स अकादमी,यू.एस.ए.हे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
या वेळी अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असे स्पष्ट करुन हे राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण शिबिर असल्याची माहिती दिली आहे.या वेळी एमबीए प्लेयर्स व कोचेस क्लिनिक कॅम्प,आंतर राष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक स्पर्धेसाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष इंद्रजित नितीनवार यांनी लवकरच डायमंड ड्रीम अॕकेडमी व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून बेसबॉल या खेळाची लोकप्रियता वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.दि.११ डिसेंबर ते १४ डिसेंबर अखेर झालेल्या प्रशिक्षणात महाराष्ट्र तुन १२० खेळाडु सहभागी झाले होते.खेळाडु मधुन मुले व मुली बेस्ट पिचर,कॅचर,हीटर,तसेच उगवता खेळाडु अशी निवड करण्यात आली व त्यांना बक्षिस स्वरूपात ट्रॉफीज देण्यात आल्या.
या शिबिराचे संयोजन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन चे अध्यक्ष अरुण चंद्रे,सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विरुपाक्ष रेड्डी,कल्पेश भागवत,शिवराज पाळणे,अक्षय येवले,कन्हैया गंगुले,सोहम को-हाळकर आदिनी प्रयत्न केले आहे.