क्रीडा विभाग
खुल्या कराटे राज्य स्पर्धेत विद्यार्थिनींचे लक्षवेधी यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या,’ओपन स्टेट चॅम्पियनशिप’ कराटे स्पर्धेत कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालय प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी तेजस्विनी अमित खोकले हिस फाईट व कतास स्पर्धेत एक सुवर्ण पदक तर एक कास्य पदक मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे.तिचे कोपरगाव शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान तिला कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे,सौ.सप्तमी ताई आदींचे सहकार्य लाभले होते.तिच्या यशाबद्दल माजी कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,शैलेंद्र ससाणे,महिला पोलीस हवालदार सरीता रासकर,पो.हे.का संदीप बोटे,रेल्वे पोलीस हवालदार आंबेकर आदींनी केले आहे.