कोपरगाव शहर वृत्त
…या शहराच्या चार प्रभागासाठी२० लाखाचे जिम साहित्य-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १,२,३ व ४ मध्ये खुले व्यायाम साहित्यासाठी २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“कोपरगाव शहरातील मोकळ्या जागेत हे जिम साहित्य बसविले जाणार असून त्यामुळे युवा वर्गाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.या जिम साहित्याचा उपयोग करून युवा वर्गाने नियमितपणे व्यायाम करून आपले शरीर सुदृढ व निरोगी बनवावे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
आ.काळे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचा दावा करून त्यांनी हे शहर विकसित शहर म्हणून कोपरगाव शहराची वाटचाल सुरु असून शहरातील प्रत्येक प्रभागात व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आ.काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील एकूण चार प्रभागांसाठी प्रत्येकी ५ लक्ष याप्रमाणे एकूण २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून प्रभाग क्रमांक ०१ मधील खडकी शाळेचे मैदान, प्रभाग क्रमांक ०२ रचना पार्क जवळील खुली जागा, प्रभाग क्रमांक ०३ लक्ष्मी आई मंदिर बाजारतळ, प्रभाग क्रमांक ०४ अन्नपूर्णा नगर बागुल वस्ती या ठिकाणी हे जिम साहित्य बसविण्यात येणार आहे.
कोपरगाव शहरातील मोकळ्या जागेत हे जिम साहित्य बसविले जाणार असून त्यामुळे युवा वर्गाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.या जिम साहित्याचा उपयोग करून युवा वर्गाने नियमितपणे व्यायाम करून आपले शरीर सुदृढ व निरोगी बनवावे असे आवाहन आ.काळे यांनी केले असून उर्वरित प्रभागाच्या मागणीनुसार त्या प्रभागात देखील जिम साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.