कोपरगाव शहर वृत्त
…या महोत्सवातून बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला गती-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावच्या गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी नुकतेच केले आहे.
“प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या गोदाकाठ महोत्सवाने आजवर हजारो बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे आणि यापुढे देखील हि सामाजिक बांधिलकी जोपासण्याची जबाबदारी पार पाडणार असून गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांचा मुख्य आधारस्तंभ झाला आहे”-आ.आशुतोष काळे,विधानसभा कोपरगाव.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव २०२३’ चे उदघाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्या वेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष,संचालक,संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,महिला मंडळांच्या सदस्या,शासकीय अधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर,नागरिक आदी उपस्थित होते.
सदर महोत्सव प्रसंगी आ.आशुतोष काळे व त्यांच्या धर्मपत्नी चैताली काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर फुगडीचा ठेका धरला तो क्षण.त्याला उपस्थित कार्यकर्त्यानी दाद दिली आहे.
दरम्यान महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची जागा वादग्रस्त असून त्याचा वाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरु असून सदर सुमारे ५३ एकर क्षेत्र जागा जिल्हाधिकारी यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिलेले असताना त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून या विरोधात याचिकाकर्ते व उद्धव सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी अवमान याचिका दाखल केलेली असून जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी,तहसीलदार आदींना नोटिसा काढलेल्या असताना हा महोत्सव संपन्न होत आहे हे विशेष ! त्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
त्या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”कोपरगावच्या पावन भूमीला गोदामाईने वळसा घालून आपल्या कवेत घेतले आहे.याच पावणभुमित मागील काही वर्षापासून बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी व त्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशातून मागील काही वर्षापासून गोदाकाठ महोत्सव सुरू करण्यात आला आहे. मागील दोन वर्ष कोरोना साथीमुळे हा गोदाकाठ महोत्सव होवू शकला नाही.त्यामुळे बचत गटाच्या महिलांची काहीशी काळजी वाढली होती.त्यावेळी ज्या बचत गटाच्या महिलांनी नाममात्र शुल्क देवून स्टॉल बुकिंग केले होते त्यांना बुकिंगची रक्कम परत देवू केली असता सर्व बचत गटाच्या महिलांनी हि रक्कम घेतली नाही पुढच्या गोदाकाठ महोत्सवाच्या स्टॉल्सची बुकिंग समजून हि रक्कम तुमच्याकडेच ठेवा हा विश्वास गोदाकाठ महोत्सवाने कमविला आहे.दोन वर्षानंतर पुन्हा एकदा हा गोदाकाठ महोत्सव सुरु झाल्यामुळे बचत गटाच्या महिलांची काळजी दूर होवून त्यांना पुन्हा एकदा उभारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून कोपरगाव शहरात बालवारकऱ्यांची दिंडी,रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची केलेली प्रतिज्ञा,झांज पथक,वासुदेव गीत,तीन पावरी नृत्य,बांबूवरील नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून उपस्थिता हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले.सजवलेल्या बैलगाडीतून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला मंडळाची काढण्यात आलेली भव्य,दिव्य मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.