निवड
नगर जिल्ह्यात कोयटे यांचा…या बड्या नेत्याच्या हस्ते सत्कार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे महेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसायटीचा प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता परिवाराचे संस्थापक,अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या निवडणूकीमध्ये ३६ देशांची शिखर संस्था असलेल्या एशियन कॉन्फडरेशन क्रेडिट ऑफ युनियन (ॲक्यू) चे संचालक आणि बहुमताने खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल भारत देशाचे सहकारातील नेते शरद पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या निवडणूकीमध्ये ३६ देशांची शिखर संस्था असलेल्या एशियन कॉन्फडरेशन क्रेडिट ऑफ युनियन (ॲक्यू) चे संचालक आणि बहुमताने खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल भारत देशाचे सहकारातील नेते शरद पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
कोयटे यांच्या या निवडीने भारताच्या सहकाराचा सन्मान जगभर झाला असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक नवीन ओळख करून दिली असल्याचे गौरवोद्गार या प्रसंगी बोलताना शरद पवार यांनी काढले.
प्रसंगी महेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे,मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष सुरेश वाबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.घनश्याम शेलार,जामखेड तालुक्यातील ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे,आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे,नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,व्यंकटेश मल्टीस्टेटचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे आदींसह श्रीगोंदा तालुक्यातील विविध पतसंस्था आणि मल्टीस्टेटचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.