कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव साठवण तलावात माशी शिंकली,काम दोन महिन्यापासून बंद !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यात भविष्यात अहंम भूमिका निभावण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या ५ क्रमांक साठवण तलावाच्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या ५ क्रमांकाच्या साठवण तलावास आज लक्ष्मी कन्ट्रक्शन या कंपनीने शुभारंभ केला असल्याच्या बातम्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झाल्या होत्या त्यास पाच महिने झाले नाही तोच या कामाला गतिरोध तयार झाला असून हे काम सुरु करण्यासाठी माहिती अधिकार संजय काळे यांना सत्याग्रह करण्याचा इशारा देण्याची नामुष्की पत्करावी लागली असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आता सदर कंपनीने कोपरगाव शहरातील नागरिकांना भविष्यात पाणी पुरवठा करण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या पाच क्रमांकाच्या तलावातील पाणी उपसा करण्यास प्रारंभ करुन बरेच उत्खनन केले आहे.मात्र गुजरात निवडणूक सुरु झाल्या असताना त्या नंतर या विकास कामास गतिरोध निर्माण झाला आहे.त्यामुळे यातील शुक्राचार्य नेमके कोण असा सवाल निर्माण झाला आहे.
कोपरगाव शहर पाणी योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी आ.आशुतोष काळे यांनी महाआघाडी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता.त्याची निविदा नुकतीच जुलै महिन्यात जाहीर झाली होती. सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले असून सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे नियोजन आहे.त्या विजबिलाचा ताण कमी करण्यासाठी सौर उर्जा वापर प्रस्तावित आहे.
कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी बनाव उभा करणाऱ्या व ४२ कोटींच्या केंद्रीय पाणी योजनेची वासलात लावणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी २.३२ द.ल.घ.मी.मंजुर केले होते.या शिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी नूतन साठवण तलावासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली होती.व सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले होते.सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.
दरम्यानच्या कालखंडात या कामाची सप्टेंबर महिन्यात बांधकाम व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती व कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले होते.
त्यानुसार साठवण तलाव क्रं.५ चे काम सुरु करण्यात आले होते.त्यासाठी पत्रकारांसह आ.आशुतोष काळे यांनी घटनास्थळी दौरा केला होता.मात्र आता हे काम काहीअंशी पूर्ण झाले.मात्र ते किती पूर्ण झाले अशी उत्कंठा नागरिकांना निर्माण झाली असताना गत साडेचार महिन्यापूर्वी राज्यातील सरकार बदलले आहे.त्याच वेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.ती आता खरी ठरताना दिसत आहे.त्यानुसार आता त्यात माशी शिंकली असल्याचे दिसत आहे.
आता सदर कंपनीने कोपरगाव शहरातील नागरिकांना भविष्यात पाणी पुरवठा करण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या पाच क्रमांकाच्या तलावातील पाणी उपसा करण्यास प्रारंभ करुन बरेच उत्खनन केले आहे.मात्र गुजरात निवडणूक सुरु झाल्या असताना त्या नंतर या विकास कामास गतिरोध निर्माण झाला आहे.त्यामुळे यातील शुक्राचार्य नेमके कोण असा सवाल निर्माण झाला आहे.
त्यासाठी कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी नुकताच २० डिसेंबर रोजी पाच क्रमांकाच्या तलावाचे काम सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.व त्यात नगर परिषद प्रशासनास काम बंद केल्या प्रकरणी जाबसाल केला होंता.दि.०२ जानेवारी रोजी सत्यागृह करण्याचा इशारा दिला होता.
त्यावर नगरपरिषदेने उत्तर देताना त्यात म्हटले आहे की,”सदर ठेकेदाराने काम बंद केले असल्याची कबुली देऊन त्यात या कामाची मुदत चोवीस महिने असल्याचे स्मरण करून दिले आहे.यात निविदा धारकाने वितरण व्यवस्था,पाण्याच्या टाक्या,अनुषंगिक कामे सुरु केल्याचे म्हटले आहे.व निविदा धारकाकडून मुदतीत काम करण्याची दक्षता घेत असल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सदर पत्रात म्हटले आहे.