कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावातील…या रस्त्यांचे काम तातडीने करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील वाहतूकींसाठी महत्वपूर्ण व सर्वाधिक वर्दळ असणारा संभाजीमहाराज पुतळा ते गोकुळ नगरी- टाकळी नाका हा रस्ता मोठा करण्यासाठी व मजबुती करून डांबरी करणासाठी निधी असूनही विलंब का होत आहे असा सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी पालिका प्रशासनास एका प्रसिद्धी पत्रकान्वये विचारला आहे.

इंदिरापथ या रस्त्यावरून,शाळा,हॉस्पिटल,धान्यमार्केट साठी तसेच शहरालगत असलेले उपनगरे या भागातील लोक ह्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.जणूकाही निधी असून दर्जेदार व काम पूर्ण न करणे हे नगरपालिकेचे जणू काही ब्रीद वाक्य झाले.याच मार्गावर खंदक नाला पुलावरील संलग्न रस्त्याची दुरवस्था दूर करणे गरजेचे आहे”-मंगेश पाटील,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांना मोठा निधी असून गत सहा-सात महिन्यापासून रस्त्यांसह विकास कामे ठप्प आहेत.त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे नागरिकांत अच्छा-खांसा असंतोष आहे.नगरपरिषद निवडणुका मुदत संपूनहीं अद्याप झालेल्या नाही.वास्तविक सदर कामे निवडणूक पूर्व होणे अभिप्रेत असताना त्याला पालिकेचा बांधकाम विभाग,’पिंडाला कावळा शिवत नाही’ तसा शिवताना दिसत नाही यामागील कारण गुलदस्त्यात आहे.वाहतुकीच्या दृष्टीने ‘इंदिरा पथ’ हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे.तथापि नगरपालिका तो करत नाही.ही मोठी खेदाची गोष्ट असून तत्काळ रस्त्याचे कामे मार्गी लावणे व रस्त्यामध्ये आलेले असलेले अतिक्रमण काढून गोकुलनगरी जवळ रस्ता रुंदीकरण करून लवकर काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
या रस्त्यावरून,शाळा,हॉस्पिटल,धान्यमार्केट साठी तसेच शहरालगतील असलेले नगरे या भागातील लोक ह्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.जणूकाही निधी असून दर्जेदार व काम पूर्ण न करणे हे नगरपालिकेचे जणू काही ब्रीद वाक्य झाले.याच मार्गावर खंदक नाला पुलावरील संलग्न रस्त्याची दुरवस्था शोचनीय आहे.त्यापुढे ‘खडकी नाका’ पुढे बाजार समिती आणि गोदावरी पेट्रोल पंम्प या रस्त्याची दुरुती गरजेची असल्याचेही माजी नगराध्यक्ष पाटील यांनी शेवटी म्हटले आहे.या बाबत नागरिकांनी त्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे.