कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरात…या दलाचे संचलन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आगामी सण उत्सवानिमित्त अज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ५ शीघ्र कृती दलाचे ४ अधिकारी ६२ जवान आदीसह शिघ्र कृती दलाचे संचलन संपन्न झाले आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला,तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंना पाचारण करावे लागले होते.अशा प्रकारचा हल्ला झाल्यास स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणा सज्ज असावी यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये तसेच जिल्हा कार्यालयांना स्वत:चे स्वतंत्र जलद कृती दल स्थापन करण्याचे आदेश दिले होते.शिर्डीसह राज्यातील विविध ठिकाणी दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता यापूर्वी गुप्तचर खात्यांकडून वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे या शीघ्र कृती दलाला विशेष महत्व आहे.
कोपरगाव शहरात व तालुक्यात विविध धार्मिक ठिकाणे व सरकारी आस्थापने,तसेच इतरही संवेदनशील संस्था आहेत.या पार्श्वभूमीवर स्वतंत्र दलाचे विशेष महत्त्व आहे.त्यामुळे कोपरगावतही हे शीघ्र कृतीदल आज दाखल झाले आहे.
कोपरगाव शहरासह देशात आणि राज्यात दीपावली हा महत्वाचा आणि मोठा सन येत्या आठवड्यात दि.२१ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार शहरात घडायला नको म्हणून शहरातील पोलीस दल सक्रिय झाले आहे.शहरातील असामाजिक तत्वांना पायबंद घालणे हे शहरातील पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.शहरातील गुन्हेगारीचा आलेख अलीकडील काळात वाढला आहे.याची दखल वरिष्ठांनी घेतली आहे.त्यासाठी त्यांचे शहरावर लक्ष आहे.आज शहरात ५ शीघ्र कृती दलाचे ४ अधिकारी ६२ जवान आदीसह शिघ्र कृती दलाचे संचलन संपन्न झाले आहे.
सदर संचलन कोपरगाव शहरणपोलिस ठाणे संमिश्र वस्ती सुदेश टॉकीज,एस.जी.शाळा,तहसील चौक,धारणगाव रस्ता डॉ.आंबेडकर पुतळा,विघ्नेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,पुन्हा पोलीस ठाणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.त्यासाठी कोपरगाव शहरातील वरिष्ठ अधिकारी वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,एस.सी.पवार आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी पोलीस कर्मचारी यात सामील झाले हॊते.