जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

अखेर कोपरगाव मालमत्ता करवाढी बद्दल झाला…हा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेत वाढीव मालमत्ता कारणावरून शहरात मोठ्या प्रमाणावर वाद वाढल्यावर त्याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली आज प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी हि करवाढ रद्द केल्याची घोषणा केली असून याचे भाजपसह मित्र पक्षांनी फटाके फोडून जोरदार स्वागत केले आहे.

दरम्यान या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणावर दोष आढळले होते.त्यात वैभव गिरमे या माजी नगरसेवकांच्या नावावर केवळ १० मालमत्ता असतांना त्या तब्बल ६५ दाखविल्या होत्या तर बाजार समितीचे माजी सचिव साहेबराव कोपरे यांच्या नावावर दोन मालमत्ता असताना ५१ मालमत्ता,राजेंद्र कोयटे यांच्या नावांवर किमान पाच मालमत्ता असताना त्या ४५ दाखविल्या होत्या.तर बागुलवस्ती कालिंदीनगर पहिलवान सर यांच्या फ्लॅटची किंमत तब्बल १४.२५ कोटी तर यावर्षीची पट्टी ४.५४ लाख दाखविली होती. व ते घर ५५ मजली दाखवुन कहर उडवून दिला होता.जो मालमत्तेचा मूळ मालक आहे.तो भाडेकरू दाखवून कहर केला होता.त्याची तर गणतीच नव्हती.त्यामुळे नागरिकांत ‘अच्छाखांसा’ राग खदखदत होता त्याचा स्फोट झाला होता.

कोपरगाव नगरपरिषदेने नुकत्याच महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ११९(१)(२) अन्वये मालमत्ता कराच्या वाढीव दराने नोटिसा काढल्या आहेत.त्यात सन-२०२२-२३ ते २०२६-२७ असा कालावधी दर्शवला आहे.करयोग्य क्षेत्रफळ,करयोग्य मूल्य,संकलित कर,विशेष शिक्षण कर,अग्निशामक कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,वृक्ष कर असे अवाजवी कर लावल्याचा ‘कोल्हे भाजप’सह नागरिकांनीं आरोप केला होता.त्या नोटीसीत नावात काही बदल,चूक,कोणतीही हरकत असल्यास पालिका मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविण्यास सांगितले आहे.मात्र राष्ट्रवादीच्या आ.आशुतोष काळे यांनी साई तपोभूमी येथे मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर वाढीव ४० टक्क्यांचा उतारा दिला होता.त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता.त्यामुळे निष्ठावान भाजप वहाडणे गट,मनसे यांनी हि करवाढ रद्द करण्याची मागणी केली होती.त्यात भाजपसह मित्र पक्षांनी साखळी उपोषण करून आंदोलनाची तीव्रता वाढवली होती.त्याला विविध संघटनांनी पाठींबा दिला होता.त्यामुळे त्याला वजन प्राप्त झाले होते.त्यामुळे सत्ताधारी वर्गावर दबाव वाढला होता.तर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी हा प्रश्न राज्याच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून हा करवाढीचा चेंडू राज्याच्या कोर्टात ढकलला होता.त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान आज दुपारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्फत जिल्हाधिकाऱ्यांनीं सांगावा धाडून या करवाढीचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर करून सत्ताधारी आ.काळे गटाची हवा काढून टाकली आहे.त्यांनी आपल्या विविध समर्थाकडून बातम्या पेरूनही उपयोग झाला नाही.त्यामुळे हा विषय आता संपला असला तरी भाजप हा प्रश्नांचा मुद्दा निवडणुकीत जरूर वापरणार असल्याचे दिसणार आहे.

याचा जल्लोष माजी आ.स्नेहलता कोल्हे,पराग संधान,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,राजेंद्र सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक,योगेश बागुल,विजय वाजे,वैभव गिरमे,रवींद्र रोहमारे,बाळासाहेब आढाव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणावर दोष आढळले होते.त्यात वैभव गिरमे या माजी नगरसेवकांच्या नावावर केवळ १० मालमत्ता असतांना त्या तब्बल ६५ दाखविल्या होत्या तर बाजार समितीचे माजी सचिव साहेबराव कोपरे यांच्या नावावर दोन मालमत्ता असताना ५१ मालमत्ता,राजेंद्र कोयटे यांच्या नावांवर किमान पाच मालमत्ता असताना त्या ४५ दाखविल्या होत्या.तर बागुलवस्ती कालिंदीनगर पहिलवान सर यांच्या फ्लॅटची किंमत तब्बल १४.२५ कोटी तर यावर्षीची पट्टी ४.५४ लाख दाखविली होती. व ते घर ५५ मजली दाखवुन कहर उडवून दिला होता.जो मालमत्तेचा मूळ मालक आहे.तो भाडेकरू दाखवून कहर केला होता.त्याची तर गणतीच नव्हती.त्यामुळे नागरिकांत ‘अच्छाखांसा’ राग खदखदत होता.त्याला भाजपच्या वतीने वाचा फोडली होती.हि खदखद ओळखण्यात आ.आशुतोष काळे व त्यांचा गट कमी पडला हे उघड आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close