कोपरगाव शहर वृत्त
…यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले उपक्रम लक्षवेधी-देसले

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जेष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी अध्यक्ष भागचंद ठोळे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरात सुरू करण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“समाजातील होणाऱ्या विघातक घटना जर वेळीच समजल्या तर त्याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर असते.विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून यश संपादन करताना दुःखी पिडीतांना मदत करणे आवश्यक आहे.विद्यार्थी सुद्धा पोलिस बनू शकतात.कुणालाही काही कौटुंबिक जीवनात अडचण आली तर कधीही आपल्याशी संपर्क साधावा”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.
कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समिती व शिंगी परीवाराच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुधा भाभी ठोळे या होत्या.सदर प्रसंगी रजनीताई गुजराथी,उत्तम भाई शहा,पेंटर दारूवाला,शिंगी शेठ,साहित्यिक हेमचंद्र भवर आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समाजातील होणाऱ्या विघातक घटना जर वेळीच समजल्या तर त्याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर असते.विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून यश संपादन करताना दुःखी पिडीतांना मदत करणे आवश्यक आहे.विद्यार्थी सुद्धा पोलिस बनू शकतात.कुणालाही काही कौटुंबिक जीवनात अडचण आली तर कधीहि आपल्याशी संपर्क साधावा आपण नक्कीच मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर आहे असे आश्वासन त्यांनी दिले आहे.व समाजातील गुणवंत,गरीब गरजू विद्यार्थ्यांना सेवा मंच व महिला समितीच्या वतीने दरवर्षी शालेय साहित्य वाटप केले जाते हि समाधानाची बाब असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भामरे सर यांनी केले तर स्वागत विजय बंब यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार गिताप्रशालेचे नायडू यांनी मानले आहे.