कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावात राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा कार्यक्रम संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे कोपरगाव शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावुन स्वतंत्र राष्ट्रध्वज या विषयावर राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा घेण्यात आली असून त्यांना पोलीसांची कार्यपध्दती,मुलांविषयी होणारे सायबर गुन्हे,वाहतुक नियम व मुलींना त्यांच्या सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मीठाचा सत्याग्रह हा निर्णायक क्षणा पैकी एक आहे.याला दांडी यात्रा म्हणून इतिहासात उल्लेख केला जातो.याच घटनेला ९१ वर्ष होत आहेत.याच वेळी देशाचा अमृत महोत्सवही साजरा केला जात आहे.स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असताना देशातील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण केली जाणार आहे.
स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा देशाला विसर पडला आहे.याच घडामोडी या माध्यमातून आजच्या पिढी समोर ठेवल्या जाणार आहेत.त्या अंतर्गत देशात विविध कार्यक्रम साजरे केले जात असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकताच विद्यार्थ्यांसाठी विविध राष्ट्रध्वज व राष्ट्रप्रेम या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.
यात पोलीस निरीक्षक देसले यांनी विविध माहिती दिली असून त्यात राष्ट्रध्वज देशाचे स्वातंत्र्य याचा समावेश आहे.यावेळी पोलीस ठाण्याचे आवार दाखवुन पोलीसांची कार्यपध्दती,मुलांविषयी होणारे सायबर होणे,वाहतुक नियम व मुलींना त्यांचे सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले आहे व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला आहे.नमुद स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचे येत्या स्वातंत्र्यदिनी प्रथम,व्दितीय,तृतीय व उत्तेजनार्थ तसेच इतर सहभागी सर्व विद्यार्थ्याना बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजीत केला आहे.
दरम्यान १३ ऑगष्ट ते १७ ऑगष्ट पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्ताने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरची राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा हि पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आयोजीत केली होती.
सदर स्पर्धा ठिकाणी पो.उपनि.रोहीदास ठोंबरे,पो.हे.कॉ.तिकाणे,पो.ना.सचिन शेवाळे, पो.कॉ.राम खारतोडे,पो.कॉ.गणेश काकडे,म.पो.कॉ.प्रिती बनकर यांचेसह शिक्षक अतुल जनार्धन कोताडे,एस.डी.गोरे,रविंद्र कांबळे,सुशांत घोडके,शिक्षीका श्रीमती कावेरी वल्टे,अजुंम कय्युम खान आदी मान्यवर उपस्थित होते.