जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पात्र कुटुबांना घरकुलाचा लाभ देण्याबाबत कोपरगावात फेरसर्वे होणार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या पात्र कुटुबांना घरकुलाच्या यादीतून वगळण्यात आले होते.त्याबाबत झालेल्या तक्रारीची दखल आ.काळे यांनी घेतली असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून या पात्र कुटुबांना घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भात फेरसर्वे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाच्या यादीत मतदार संघातील अनेक गावातील हजारो पात्र कुटुबांचे नाव नसल्यामुळे हे कुटुंब घरकुलापासून वंचित राहिले होते.विविध कारणांमुळे या पात्र लाभार्थ्यांचा घरकुल मंजूर झालेल्या यादीमध्ये समावेश नव्हता व त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ देण्याबाबत अपात्र ठरवण्यात आले होते.त्या नंतर हा निर्णय घेतला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,”शासनाच्या निर्देशाप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुबांना ज्यांना स्वतःचे घर नाही अशा नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून अशा पात्र कुटुबांची ‘आवास प्लस ॲप’ मार्फत नोंदणी करण्यात आली आहे.मात्र मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाच्या यादीत मतदार संघातील अनेक गावातील हजारो पात्र कुटुबांचे नाव नसल्यामुळे हे कुटुंब घरकुलापासून वंचित राहिले होते.ग्रामीण भागातील अनेक पात्र कुटुबांना काही तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे या पात्र लाभार्थ्यांचा घरकुल मंजूर झालेल्या यादीमध्ये समावेश नव्हता व त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ देण्याबाबत अपात्र ठरवण्यात आले होते.त्याबाबत आ.काळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अशा पात्र असणाऱ्या कुटुबांचे फेर सर्वेक्षण करून या कुटुबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता.

त्या पाठपुराव्यातून जे पात्र कुटुंब घरकुलाच्या यादीत आले नाहीत अशा लाभार्थ्यांचा फेर सर्वे करून या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.त्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ५००० पेक्षा जास्त कुटुबांना त्याचा फायदा होणार आहे.ज्या पात्र कुटुबांची नावे घरकुल यादीत आलेले नाहीत अशा कुटुबांचा फेरसर्व्हे करण्यात येणार आहे.

त्यामुळे अशा कुटुंब प्रमुखांनी आपली अचूक माहिती फेर सर्वे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्यावी व पात्र लाभार्थी पुन्हा घरकुलापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन.आ. काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close