कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरातील नागरिकांना दिवसाड पाणी द्या-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरीत नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहात असताना कोपरगाव शहराला सहा दिवसाआड पाणी मिळत असून हि घटना शहरातील नागरिकांवर अन्याय करणारी असून नागरिकांना दिवसाआड पाणी मिळावे अशी मागणी येथील कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी नगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान राज्याच्या जलसंपदा विभागाने कोपरगाव तालुक्यातील या प्रस्थापित नेत्यांच्या नाकाखालून येवला तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील राजापूरसह चाळीस गावांना दि.०७ मार्च २०२२ रोजी २.६८ द.ल. घ.मी.पाणी मंजूर केले मात्र त्यांनी त्या बाबत चकार शब्द काढला नाही.कोपरगाव शहराचे तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नेत्यांची पाणी चोरी उघड केल्यावर यांनी आपल्या संस्थांना दि.०५ मार्च २०२१ रोजी पाणी मंजुरी मिळवली हे लपून राहिले नाही.शहरात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे.पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.दिवसभर मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस नाशिक शहरासह परिसरात सुरुच आहे.यामुळे गोदावरीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून नदीत आलेले पावसाचे पाणी दारणा आणि गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदावरी नदी दुथडी भरून ओसंडून वाहू लागली आहे.मात्र आजही भर पावसाळ्यात कोपरगाव कारांना मात्र सहा दिवसाआड पाणी मिळत आहे.
कोपरगाव शहराला जलसंपदा विभागाकडून यापूर्वी ५.९६ द.ल.घ.मी.पाणी मंजूर होते.मात्र राजकीय नेते आणि त्यांच्या सहकारी संस्था यांच्या कडून होणारी पाणी चोरी,साठवण क्षमतेचा अभाव,गळती,शहरातील चोवीस तास पाणी पूरवठा करणारे नळ,सदोष वितरण व्यवस्था आदी कारणामुळे शहरातील नागरिकांना कधीच पुरेसे पाणी मिळाले नाही.त्यामुळे निळवंडे धरणाचे गाजर दाखवून आपल्या निवडणुकांच्या मतांची बेगमी करण्याचा डाव तत्कालीन सत्ताधारी आमदारांनी आखला गेला होता.तो निळवंडे कालवा कृती समितीने सदर जलवाहिनी हि दुष्काळी शेतकऱ्यांवर नैसर्गिक न्यायाने अन्याय करणारी असल्याने आंदोलने व न्यायिक लढा करून हाणून पाडली आहे.यावर उतारा म्हणून वर्तमान आ.आशुतोष काळे यांनी साठवण तलावाची निर्मितीवर भर दिला होता.व त्यासाठी १३१.२४ कोटींचा निधी मंजूर केला आहे.या शिवाय शहरासाठी पाणी कमी नसल्याचे जलसंपदा विभागाचे अहवाल असतानाही विरोधी आमदार कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी विना कारण कावकाव केल्याने दि.२ डिसेंबर २०२१ ला ३.३२ द.ल.घ.मी.मंजुरी मिळवली होती.त्याचा कार्यारंभ आदेश दि.०५ जुलै २०२२ रोजी प्राप्त झाला असल्याने हे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे.त्यामुळे हि समस्या संपुष्टात येणार आहे.आपण या पूर्वी वर्तमान मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना पंधरा दिवसापूर्वी भेटून तशी मागणी केली होती.मात्र त्यांनी त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही असा खेद व्यक्त केला असून वर्तमानात किमान दिवसाड पाणी मिळणे गरजेचे आहे.सरोदे मुख्याधिकारी असताना पाणी मिळत होते असा दावा हि त्यांनी केला आहे.व शहरातील नागरिकांना पूर्ववत पावसाळ्यात दिवसाड पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांचे कडे शेवटी राजेश मंटाला यांनी केली आहे.