जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

दिव्यांगाना मोफत साहित्य वाटप संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   संजीवनी युवा प्रतिष्ठान व साधू वासवानी ग्रुपच्या वतीने सहकार महर्षी,माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त अपघात किंवा इतर कारणांनी नैसर्गिक अवयव गमावलेल्या दिव्यांग गरजू व्यक्तींना मोफत साहित्य व प्रमाणपत्रांचे वाटप संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची  माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

अपघात किंवा इतर कारणांनी नैसर्गिक अवयव गमावलेल्या दिव्यांग गरजू व्यक्तींना मोफत साहित्य वाटप करताना रेणुका कोल्हे.

“संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बंधू-भगिनींना दर महिन्याला प्रमाणपत्रे मिळवून देण्याचे काम केले जाते.त्यासाठी त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था देखील करण्यात येते.तसेच इतर सरकारी योजना व लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे”- रेणुका कोल्हे,कोपरगाव.

   १६ मार्चला सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची पुण्यतिथी,तर २४ मार्चला जयंती प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दरम्यानचा सात दिवसांचा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.सदर प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,नारायण अग्रवाल,नगरसेवक आकाश वाजे,संतोष गंगवाल,दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे,स्वप्निल कडू,डॉ.मिलिंद जाधव,योगेश गंगवाल,फकीरमहमंद पहिलवान,खालीक कुरेशी,माजी नगरसेवक जयवंत मरसाळे तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांच्यासह दिव्यांग बांधव बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१६ मार्चला सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची पुण्यतिथी,तर २४ मार्चला जयंती प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दरम्यानचा सात दिवसांचा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close