जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरातील नागरिकांना लवकरच शास्तीमाफी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्ती माफी करण्यात यावी याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी कोपरगावकरांना लवकरच शास्ती माफी करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कोपरगाव नगरपरिषद थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्ती माफी करण्यात यावी याबाबत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना आ.आशुतोष काळे दिसत आहेत.

   कोपगाव सारख्या काही शहरांत कोरोना काळ किंवा इतर कारणांमुळे थकलेल्या शास्तीकरात (मालमत्ता करावरील दंड) माफीची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील नागरिकांना अशा शास्ती माफ केल्याची उदाहरणे आहेत.नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामांना दिलासा देण्यासाठी ठराविक क्षेत्रफळाच्या मालमत्तांवर ५० टक्के  ते १०० टक्के शास्ती माफीचे प्रस्ताव नगरसेवकांकडून विविध संघटनांकडून मुख्याधिकारी आदीकडे मांडले जातात,जेणेकरून थकबाकी वसूल होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.कोपरगावात हिच मागणी नागरिकांकडून होत आहे.याची दखल घेऊन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

  

कोपरगावकरांवर कराचा अतिरिक्त बोजा पडू नये व नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या दुहेरी उद्देशातून महायुती शासनाने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.त्या बाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला मागील वर्षी त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल आहे.

    त्यांनी याबाबत पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील नागरीकांना लवकरात लवकर थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्ती माफी करण्यात यावी याबाबत निवेदन दिले आहे.सर्व सामान्य कोपरगावकरांवर कराचा अतिरिक्त बोजा पडू नये व नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या दुहेरी उद्देशातून महायुती शासनाने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.त्या बाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला मागील वर्षी त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना करून सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

   दरम्यान त्या प्रस्तावाची आपण गांभीर्याने दखल घेवून या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना अंतर्गत कोपरगावकरांचा शास्ती (दंड) माफ करावी अशी मागणी राज्याचे नगरविकासमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोपरगावकरांना लवकरच १०० टक्के शास्ती माफी करण्यात येईल असे आश्वासन आ.काळे यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close