जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या पालिकेच्या स्थायीची बैठक संपन्न,वादाचा गणेश सुरू!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
   कोपगाव नगरपरिषदेचा अर्थसंकल्प आज आयोजित केलेल्या स्थायी समितीत सादर करण्यात आला असून त्यात महिलाना सुमारे 10 नवी स्वच्छता गृह बांधण्यासाठीची तरतूद 0.80 लाख रुपयांवरून वाढवून 01 कोटी तर शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी 0.50 लाख रुपयांवरून 01 कोटी तर शहरातील विविध बागांचे सुशोभीकरण कारणासाठी 01 कोटींची तर आपत्ती व्यवस्थापनासाठी 0.60 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती भाजप कोल्हे गटाचे गट नेते प्रसाद आढाव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.दरम्यान त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी टीका केली आहे.त्यामुळे वादाचा शिमगा आणि त्याचा गणेश सुरू झाला असल्याचे मानले जात आहे.

प्रसाद आढाव,गटनेते,भाजप कोल्हे गट.

 

“कोपरगाव नगरपरिषदेने कोणत्या प्रभागाला किंवा विभागाला किती निधी मिळणार या बाबतची पत्रकात कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.मागील वर्षाच्या २०२५-२६ च्या जमाखर्च तपासणी नुसार ज्या हरकती असतील त्या निकाली निघाल्या आहे का ? निघाल्या नसतील तर आत्ताच्या वित्तीय अंदाजपत्रकामध्ये त्या बाबतच्या काही तरतुदी करण्यात आल्या आहेत  का ? तसेच मागील वर्षी मंजूर केलेल्या तरतुदींचे कामे पूर्ण झाली आहेत का ? झाली नसेल तर २०२६-२७ वित्तीय अंदाजपत्रकाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठीच्या बाबी तपासल्या आहेट का ?-जनार्दन कदम,नगरसेवक विरोधी गट,कोपरगाव नगरपरिषद.

 

जनार्दन कदम,विरोधी गट नगरसेवक.

  कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक दिनाक 20 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली आहे.त्यात भाजप कोल्हे गटास 19 जागा तर काळे गटास 1 जागा तर शिवसेना बंडखोर गटास 04 जागा प्राप्त झाल्या आहेत.आता स्वप्न रंजन संपून आता प्रपंच सुरू झाला आहे.त्यामुळे खरे कसरत आता सुरू झाली असल्याचे मानले जात आहे.उत्पन्न आणि खर्च यांचा प्रत्यक्ष मेळ घालण्याचे जोखमीचे काम आता कुठे सुरू झाले असून त्याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यातच आज स्थायी समितीची पहिलीच बैठक नगराध्यक्ष पराग संघान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.त्यात केलेली तरतूद आज समोर आली आहे.त्यामुळे आगामी सरकारचा दृष्टिकोन समोर आला असल्याचे मानले जात आहे.शहरातील महिलाना निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे आज स्वच्छता गृह बांधण्यासाठीची तरतूद 0.कोटी लाख रुपयांवरून वाढवून 01 कोटी तर शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी 0.50 कोटी रुपयांवरून 01 कोटी तर शहरातील विविध बागांचे सुशोभीकरण कारणासाठी 01 कोटींची तर आपत्ती व्यवस्थापना तथा शहराचे आरोग्य आणि रोगराई निर्मूलन आदीसाठी 0.60 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.व स्वच्छता गृहांचा प्रश्न आमचे नगराध्यक्ष पराग संधान मार्गी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विद्या सोनवणे,स्थायी समिती सदस्या.

“कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील महिला भगिनींच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न हा किती महत्त्वाचा आहे याची जाणीव टीका करणाऱ्या विरोधकांनी आपल्याच कुटुंबातील माता-भगिनींना प्रश्न विचारून करावी म्हणजे त्यांना हा अर्थसंकल्प किती उपयोगी आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही”-विद्या सोनवणे,स्थायी समिती सदस्या,कोपरगाव नगरपरिषद.

   दरम्यान या तरतूदीवर विरोधी राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे सदस्य जनार्दन कदम यांनी टीका केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव नगरपरिषद स्थायी समितीने सादर केलेले अंदाज पत्रक कोपरगाव शहराच्या अजिबात हिताचे नसल्याचा आरोप केला असून या अंदाजपत्रकामध्ये उणीवा आहेत.नागरीकांना अपेक्षित असलेली विकास कामे होवून कोपरगाव शहराचा विकास पण झाला पाहिजे परंतु त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उत्पन्न देखील वाढवणे गरजेचे आहे.कोणत्या प्रभागाला किंवा विभागाला किती निधी मिळणार या बाबतची पत्रकात कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.मागील वर्षाच्या २०२५-२६ च्या जमाखर्च तपासणी नुसार ज्या हरकती असतील त्या निकाली निघाल्या आहे का ? निघाल्या नसतील तर आत्ताच्या वित्तीय अंदाजपत्रकामध्ये त्या बाबतच्या काही तरतुदी करण्यात आल्या आहेत  का ? तसेच मागील वर्षी मंजूर केलेल्या तरतुदींचे कामे पूर्ण झाली आहेत का ? झाली नसेल तर २०२६-२७ वित्तीय अंदाजपत्रकाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठीच्या बाबी तपासल्या आहेट का ? असे सवाल केले आहे.त्यासाठी स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात योग्य तो बदल करून शहर हिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी नगरसेवक जनार्दन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.  

      दरम्यान टीका करणाऱ्यांनी स्वतः प्रशासक काळात कवडीचेही योगदान शहर विकासात द्यायचे नाही आणि त्यांच्या प्रतिनिधींनी शहर विकासाच्या प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीवर विनाभ्यास तारे तोडायचे हे दुर्दैवी आहे.महिला भगिनींच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न हा किती महत्त्वाचा आहे याची जाणीव टीका करणाऱ्या विरोधकांनी आपल्याच कुटुंबातील माता-भगिनींना प्रश्न विचारून करावी म्हणजे त्यांना हा अर्थसंकल्प किती उपयोगी आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.टीका स्थायी समिती सदस्या विद्याताई सोनवणे यांनी विरोधी नगरसेवक जनार्दन कदम यांचेवर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close