कोपरगाव शहर वृत्त
…या शहरातील महोत्सवास मोठी उलाढाल-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यभरातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी गोदाकाठ महोत्सवात विक्रीसाठी ठेवलेल्या घरगुती उत्पादनाच्या खरेदीसाठी शहर वासियानी पहिल्या मोठा प्रतिसाद दिल्यामुळे चार दिवसात जवळपास सव्वा दोन कोटीची उलाढाल झाली असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

“गोदाकाठ महोत्सव म्हणजे महिलांच्या कष्टांना मिळालेला सन्मान,त्यांच्या स्वप्नांना मिळालेले आकाश आहे.बचत गटाच्या महिलांनी कर्तृत्व,कौशल्य आणि स्वाभिमान सिद्ध केला असून ही केवळ बाजारपेठ नाही,तर आत्मसन्मानाचा उत्सव आहे.महिला सक्षमीकरण,स्वावलंबन व स्थानिक उद्योजकतेला बळ देणारा हा उत्सव आहे”-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव येथील प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव आयोजित केला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा याआधीच आयोजकांनी केला होता.त्यात तिसऱ्या दिवशीही कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी केली असल्याचे दिसून आले असून अखेरच्या दिवशी जवळपास सव्वादोन कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती हाती आली आहे.
याबाबत पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,”महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.महिला स्वयंपूर्ण झाल्यास कुटुंबाचा आर्थिक पाया मजबूत होतो आणि समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होतो.महिलांच्या कौशल्यांना आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात गोदाकाठ महोत्सवाच्या स्वरुपात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या गोदाकाठ महोत्सवात शहरासह ग्रामीण भागातील महिला बचत गट,महिला उद्योजिका,गृहउद्योग करणाऱ्या महिला तसेच स्वयंरोजगारावर आधारित व्यवसाय करणाऱ्या महिलांनी सहभाग नोंदवला व कोपरगावकरांनी चारही दिवशी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे चार दिवसाची आर्थिक उलाढाल जवळपास सव्वा दोन कोटी झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान या वर्षी ३५० स्टॉल्स उभारूनही अनेक बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स मिळाले नाहीत त्यामुळे बहुसंख्य बचत गटाच्या महिलांनी२०२७ च्या गोदाकाठ महोत्सवाचे स्टॉल्स बुकिंग आगामी भरून ठेवले असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक,कार्यकर्ते,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोदाकाठ महोत्सवात सगमनेर येथील समता रक्त पेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बहूसंख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.



