कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात प्रलंबित विकास कामांना मुहूर्त !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विविध महत्वाच्या विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे.त्या निधीतून कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील एकूण १४.८८ कोटीच्या विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“मंजूर कामामध्ये कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्ते,गटार,पेव्हर ब्लॉक बसविणे,पूल तयार करणे,वॉल कम्पाऊंड बांधणे,सुशोभिकरण करणे,सभामंडप व सामाजिक सभागृह बांधणे,कब्रस्तान दुरुस्ती,व्यायाम शाळा दुरुस्ती अशा विविध विकासकामांचा समावेश आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
राज्यातील महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला दोनच दिवसापूर्वी मुदतवाढ दिली आहे.त्यानुसार आता राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.मात्र,ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही.परिणामी सर्वोच्च न्यायालय नाराज असून त्यांनी ही मुदत ठरवून दिल्याने आता निवडणूक आयोगाने राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण ठरविण्यासाठी सोमवारी दि.०६ ऑक्टोबर रोजी मुंबईत सोडत होत असल्याची विश्वसनीय माहिती असून या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार.झेड.पी.आणि नगरपालिका आता निवडणूक तयारीच्या अंतिम टप्प्यात आरक्षण सोडतीनंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे आता विकास कामाच्या झपाटा वाढणार हे ओघाने आलेच.
कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांनी नवीन विकास कामे नगर विकास विभागाकडून मंजूर करून आणले असल्याची माहिती आहे.त्यात त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास करणेसह शहर सुशोभिकरण,प्रत्येक प्रभागातील रस्ते पूर्ण करून नागरीकांच्या अडचणी दूर केल्या आहेत.व पुन्हा एकदा १४.८८ कोटीच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून असल्याचे माहिती दिली आहे.
यामध्ये कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्ते,गटार,पेव्हर ब्लॉक बसविणे,पूल तयार करणे,वॉल कम्पाऊंड बांधणे,सुशोभिकरण करणे,सभामंडप व सामाजिक सभागृह बांधणे,कब्रस्तान दुरुस्ती,व्यायाम शाळा दुरुस्ती अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.