जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

ज्यांनी जनसंघाला चटके दिले त्यांच्याच हातून मिसाबंदीचा सत्कार ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीच्या काळात देशभर संघर्ष झाला त्यात अनेकाना अनेक वर्षे कारागृहाची हवा खावी लागली ही त्यांची स्वातंत्र्याची दुसरी लढाई असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.विशेष म्हणजे ज्या काँग्रेसने जनसंघाच्या या कार्यकर्त्यांचे हाल केले त्यांच्याच हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान मिसाबंदी कायद्याची अंमलबजावणी केली त्यावेळी बाळासाहेब विखे त्याच काँग्रेस पक्षाचे खासदार होते आणि आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे हे त्यांचे चिरंजीव असून जनसंघाचे हाल करणाऱ्यांच्या हस्तेच हा सत्कार सोहळा संपन्न झाल्याने मिसाबंदीत शिक्षा भोगलेल्या अनेक कुटुंबांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली असून एक प्रकारे त्यांच्या कार्याचा तो अवमान समजला जात आहे.त्यातून भाजपचा राजकीय स्तर किती घसरला याचे ते आगामी काळात उदाहरण म्हणून गणले जाणार असल्याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

  
  कोपरगाव तालुका भाजप,वसंत स्मृती कार्यालय खा.स्व.सुर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करून ५० वर्षांपूर्वी १९ महिने तुरूंगवास भोगला,अशा तालुक्यातील २४ सेनानी व ३१ दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर होते.

मिसाबंदीतील कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करताना मंत्री विखेसह विजय वहाडणे.

  

“आमच्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांवर काही बाका प्रसंग आला किंवा कोणी आणला तर सर्वांनी त्याचा एकदिलाने मुकाबला केला आगामी काळात तो केल्याशिवाय राहणार नाही”- विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे तालुकाध्यक्ष वाल्मिक भोकरे,भारतीय दूरसंचार कंपनीचे संचालक रवींद्र बोरावके,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,भाजपचे तालुकाध्यक्ष वाल्मिक भोकरे,माजी अध्यक्ष नामदेव जाधव,सुभाष दवंगें,हरिभाऊ लोहकने,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,उमाताई वहाडणे,माजी नगरसेवक संजय कांबळे,चेतन खुबानी,सोमनाथ चांदगुडे,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,योगेश वाणी,सतीश कृष्णानी,वसंत जाधव,कैलास खैरे,कैलास सिनगर,सोपान वहाडणे,भाऊसाहेब कासार आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते,आणीबाणीत नंतर दिवंगत कार्यकर्त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे बोलताना.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मिसा  कायदा,ज्याला मराठीमध्ये ‘अंतर्गत सुरक्षा कायदा म्हणतात,हा १९७१ मध्ये मंजूर झालेला एक वादग्रस्त कायदा होता.या कायद्याद्वारे सरकारला,विशेषतः इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, लोकांना अटक करण्याचा आणि त्यांना ताब्यात घेण्याचा मोठा अधिकार मिळाला होता,ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली होती.या कायद्याचा उद्देश “अंतर्गत सुरक्षा” राखणे हा होता.परंतु, याचा उपयोग अनेकदा राजकीय विरोधकांना गप्प करण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केला गेला.सन -१९७५-७७ दरम्यानच्या आणीबाणीच्या काळात या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला.अनेकांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले आणि त्यांच्यावर खटले न चालवता त्यांची धरपकड करण्यात आली यात कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अनेक तत्कालीन जनसंघाच्या ५५ हून अधिक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबण्यात आले होते.त्यांना दिड वर्षे कुटुंबापासून वेगळे करून शिक्षा करण्यात आली होती.त्यामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली.अनेकांच्या स्त्रियांनी घराबाहेर पडून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकला होता.त्यातून त्यांना अनेक यातना भोगाव्या लागल्या होत्या त्याचे स्मरण ठेवून विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला ही राज्यातील पहिलीच घटना असावी असा गौरव त्यांनी केला आहें.

उपस्थित मिसाबंदी व त्यांचे कुटुंबीय.

   दरम्यान यावेळीं मंत्री विखे यांच्या हस्ते आणीबाणीत शिक्षा भोगलेल्या मान्यवर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.या शिवाय जे कार्यकर्ते दिवंगत झाले त्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवगे

  यावेळी प्रास्ताविक विजय वहाडणे यांनी केले त्यावेळी त्यांनी अनपेक्षितपणे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे तोंडभरून कौतुक केले असून त्यात त्यांनी भावनावेगात जाऊन जसे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तसेच राधाकृष्ण विखे आगामी काळात त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्री बनतील असा आशावाद व्यक्त केला आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.तर अनेकाना काही महिन्यावर आलेले आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर तरळली आहे.त्यांनी बोलण्याच्या ओघात विखे यांच्या दरबारात आपण तीन -तीन हजार लोक आलेले पहिले असून ते प्रत्येकाचे प्रश्न सोडवत असतात असे सांगून काही लोक राहिले असतील तर त्यांची यंत्रणा प्रत्येकाचे प्रश्न सोडवून प्रत्येकाच्या पत्राला उत्तर देत असल्याचे कौतुक केले आहे.त्यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळातील बडदे कुटुंबीय त्यांचे पिताश्री माजी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा.स्व.सूर्यभान वहाडणे,भीमराव बडदेसह तत्कालीन लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्याचे स्मरण केले असून त्यांना त्यांच्यासमोर त्यांच्या स्मृती तरळल्या आहेत.

   दरम्यान त्यावेळी त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर काही बाका प्रसंग आला तर सर्व एकदिलाने त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहत नाही असे सांगून आगामी नगरपालिका,जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली असून आगामी निवडणुकीची बेगमी केली आहे.

  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष दवगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हरिभाऊ लोहकणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close