जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन आणि अधिकाऱ्यांची धावाधाव !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी डॉ.पंकज आसिया यांनी आज कोपरगाव येथे तहसील कार्यालयात जवळजवळ चार-साडे तास भेट देऊन विविध विभाग प्रमुखांच्या कामाची झाडाझडती घेताना विविध विभागांना भेट दिल्या आहेत व अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या आहेत.आज दिवसभर अधिकाऱ्यांची धावाधाव दिसून आली आहे.या दरम्यान तहसील कार्यालय मात्र कधी नव्हे इतके स्वच्छ झाल्याचे दिसून आले असून खालील मजल्यावरील स्वच्छतागृह सुरू असल्याचे व स्वच्छ झाल्याचे दिसून आले आहे.त्याबद्दल नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून त्यांनी खालच्या मजल्यावरील स्वच्छतागृह कायम सुरू ठेवावे अशी तालुक्यातील नागरिकांनी मागणी  केली आहे.

दरम्यान एरव्ही कोपरगाव तहसील कार्यालय आणि स्वच्छ्ता यांचे हाडवैर असल्याचे वारंवार दिसून आले आहे.मात्र आज हे कार्यालय स्वच्छ आणि पिचकाऱ्या मुक्त असल्याचे दिसून आले आहे.विशेष बाब म्हणजे खालील नायब तहसील कार्यालयाच्या दक्षिण बाजूस असलेले स्वच्छतागृह चक्क उघडे दिसून आले आहे.मात्र त्या ठिकाणी पुरुषाच्या स्वच्छतागृहास महिलांसाठी असे लिहून कहर उडून दिला आहे.

  

जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी आज कोपरगाव तालुका कृषी विभागास भेट देऊन कार्यालयाबाबत,’उत्तम कार्यालय प्रबंधन,नागरिकांच्या छान सोयी’ असा चांगला शेरा मारून कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.

   जिल्हाधिकारी डॉ.पंकज आसिया यांची याच महिन्याच्या प्रारंभी बदली झाली आहे.डॉ.पंकज आसिया हे २०१६ च्या बॅचचे सनदी अधिकारी असून ते जोधपूर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आहेत.त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे.वडिलांची इच्छा डॉक्टर होती.त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली.त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला.पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले.त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले.२०१६ मध्ये त्यांना देशात ५६ रँकवर आयएएस मानाकंन मिळविले.त्यानंतर मालेगाव (नाशिक)येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर करोना मुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती.त्यानंतर त्यांची नगर येथे मागील महिन्यात बदली झाली आहे.

जिल्हाधिकारी यांनी आज सायंकाळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करताना वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश बुट्टे आणि सहकारी दिसत आहे.

   दरम्यान त्यांनी जिल्हाभर विविध विभागीय कार्यालयास भेटी देण्याचा धडाका सुरू ठेवला असून ते संयत अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यांनी आज सकाळी आधी पोलिस आणि बांधकाम विभागाचा आढावा घेतला असून त्यात त्यांनी वाळूचोरी आणि गुन्हेगारी कमी करण्याची सूचना दिली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यानंतर त्यांनी भूमिअभिलेख,पंचायत समिती,आरोग्य विभाग,महावितरण कंपनी,मुक्त आणि प्रशासक राज असलेली कोपरगाव नगरपरिषद,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,जळजीवन मिशन,जीवन प्राधिकरण विभाग,वन विभाग,सामाजिक वनीकरण,कृषी विभाग आदींचा आढावा घेतला आहे.त्याबाबत त्यांनी काही सूचना केल्या आहेत.दरम्यान त्यांनी दुपारी चार वाजेनंतर तालुका कृषी विभाग,कोपरगाव नगरपरिषद,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय आदींना भेटी दिल्या आहेत.जाते वेळी त्यानी माध्यमकर्मिंशी संपर्क साधला असून त्याबाबत दिवसभराच्या आढाव्याची माहिती दिली आहे.

  

तहसील कार्यालयात आज विशेष बाब म्हणजे खालील नायब तहसील कार्यालयाच्या दक्षिण बाजूस असलेले स्वच्छता गृह उघडे दिसून आले आहे.मात्र त्या ठिकाणी पुरुषाच्या स्वच्छतागृहास महिलांसाठी असे लिहिले असल्याचे दिसून आले आहे.

  दरम्यान या दिवसभराच्या आढाव्याची चांगलीच धास्ती विविध विभागाच्या प्रमुखांनी घेतली असल्याचे दिसून आले आहे.त्यांची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान त्यांनी सर्वाधिक चर्चेचा नगर मनमाड रस्त्याची माहिती घेऊन त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान एरव्ही कोपरगाव तहसील कार्यालय आणि स्वच्छ्ता यांचे हाडवैर असल्याचे वारंवार दिसून आले आहे.बऱ्याच वेळा अस्वच्छता दिसून येत असून जिकडे तिकडे नागरिकांनी पिचकाऱ्या मारून भिंती रंगविलेल्या असल्याचे दिसून येत असून या कार्यालयातील स्वच्छतागृह बऱ्याच वेळा बंद असल्याने महिला आणि नागरिकांना नैसर्गिक विधी कुठे करावे यांची भ्रांत असते मात्र आज हे कार्यालय स्वच्छ आणि पिचकाऱ्या मुक्त असल्याचे दिसून आले आहे.विशेष बाब म्हणजे खालील नायब तहसील कार्यालयाच्या दक्षिण बाजूस असलेले स्वच्छता गृह उघडे दिसून आले आहे.मात्र त्या ठिकाणी पुरुषाच्या स्वच्छतागृहास महिलांसाठी असे लिहून कहर उडून दिला असल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close