कोपरगाव शहर वृत्त
पुन्हा एकदा साठवण तलावाची वाजली पुंगी….!

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमित पाणी मिळावे यासाठी सुरु असलेल्या चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व सबंधित ठेकेदारास दिल्या आहेत.त्यामुळे निवडणूक काळात या साठवण तलावाचे उद्घाटन हा केवळ निवडणूकपूर्व बनाव असल्याचे उघड झाले आहे.आगामी काळात पुन्हा एकदा नगरपरिषद निवडणुका जवळ आल्या असल्याचे मानले जात आहे.त्याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव आणि शिर्डीच्या निळवंडे बंदिस्त जलवाहिनीवर मोठे राजकारण घडले होते.त्यात निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता व उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांच्या तोंडातून साखर सम्राटांनी आपल्या मद्यासांठी काढलेले पाणी रोखले होते.त्याचा मोठा राजकीय फायदा आ.आशुतोष काळे यांना झाला होता.
कोपरगाव शहरास पिण्याचे पाणी पुरविण्यात भविष्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावास विधानसभा निवडणूक पूर्व रविवार दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ५ नंबर साठवण तलावाचे साधू संतांचे व शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले होते.कोपरगाव शहरातील नागरिकांना गोदाकाठी जवळ असूनही पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होते.यावर काम कमी आणि राजकारण जास्त झाले होते.त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत बंदिस्त जलवाहिनी,पाच क्रमांकाचा साठवण तलाव,पाणी चोरी,वितरण व्यवस्थेत असलेले दोष याची जास्त चर्चेचे गुऱ्हाळ होत होते.मात्र सन-२०१९ च्या निवडणुकीत कोपरगाव आणि शिर्डीच्या निळवंडे बंदिस्त जलवाहिनीवर मोठे राजकारण घडले होते.त्यात निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता व उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांच्या तोंडातून साखर सम्राटांनी आपल्या मद्यासांठी काढलेले पाणी रोखले होते.त्यातील बनाव निळवंडे कालवा कृती समितीसह माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनीही उघड केला होता.तर तत्कालीन भाजप कार्यकर्ते विजय वहाडणे यांनीही यातील हवा काढण्याचे काम केले होते.दुष्काळी आठमाही असलेल्या निळवंडे धरण क्षेत्रातून सदर पाणी हे बारमाही असलेल्या गोदावरी कालव्यांच्या क्षेत्रात आणण्याचा राजकारण्यांचा बेकायदा डाव कालवा समितीने उधळून लावला होता.त्यानंतर या विरोधी लाटेचा फायदा राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांना मोठ्या प्रमाणावर मिळाला होता.परिणामी त्यांनी या पाणी योजनेला गती देण्याचे काम निवडून आल्यावर हाती घेतले होते.मात्र आधी याला सत्तेत असलेल्या आगंतुक ईशान्य गडावरील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता.त्यांनी समृध्दी वरील यंत्रणा वापरण्यास विरोध केला होता.त्यातून या पाच क्रमांकाच्या कोपरगाव तलावाची खोदाई होणार होती ती तातडीने बंद करणेत आली होती.

राज्यातील नगरपरिषद निवडणुका आगामी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे आणि या निवडणुकीची चाहूल लागल्याने आ.आशुतोष काळे यांनी आपल्या पूर्वसुरीनी जे कोपरगाव शहराच्या पाण्यावर जे राजकरण केले त्यांची पुनरावृत्ती आपण पुन्हा एकदा करत असल्याचे दाखवून दिले आहे.आता उन्हाळा केवळ उणापुरा एक महिना राहिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही जलवाहिनी जोडणीची तयारी दीड वर्षांनी सुरू केली आहे.ही निवडणूक पूर्व तयारी असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आले आणि शरद पवार यांचे मदतीने या तलवाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले होते.मात्र सदरचे सरकार दोन वर्षातच गडगडले आणि पुन्हा एकदा शिंदे गटाच्या मदतीने भाजप सत्तेत आल्याने त्यांच्या सोबत अजित पवार आल्याने हे काम आ.आशुतोष काळे यांना त्यांच्या विचाराचे विजय वहाडणे नगराध्यक्ष असल्याने सोपे गेले होते.त्याचा पुरेपूर वापर त्यांनी विधानसभा निवडणुकीत करून घेतला होता व त्यातच ईशान्य गडाच्या चौकशा त्यांच्या पथ्यावर पडल्या होत्या.परिणामी त्यांना मागील वर्षीची विधानसभा निवडणूक सोपी गेली नव्हे तर दहा बोटे तुपात बुडाली… हे नव्याने सांगण्याची गरज उरत नाही.त्यावेळी त्यांनी निवडणुकीपूर्वी या तलावाचे साधूसंत एकत्र आणून त्यांचे वाजतगाजत उद्घाटन केले होते.त्यावेळी तलाव अर्धवटच होता.मात्र कोपरगाव तहसीलच्या कार्यालयाचे जसे माजी आ.अशोक काळे यांनी सन-२०१४ साली जसे घाईघाईने अपूर्ण कामाचे उद्घाटन केले होते.त्याची पुनरावृत्ती केली होती.त्याची पोलखोल आमच्या प्रतिनिधीने व माहिती अधिकार संजय काळे यांनी सप्रमाण केली होती.पाच क्रमांकाच्या तलावात अद्याप पाईप लाईन न जोडताच नागरिकांना आता दिवसाआड पाणी कसे मिळत आहे.त्यामुळे शहरातला पाणी कमी नव्हते हा निळवंडे कालवा कृती समितीचा दावा सप्रमाण सिद्ध केला होता.आजही सदर तलाव जलवाहिनीने जोडलेला नाही,त्या पाण्याचा वापर होत नाही हे उघडेनागडे वास्तव समोर आले आहे.तरीही नागरिकांना चार दिवसाआड पाणी मिळत होते.मात्र त्यावेळी मात्र उन्हाळा यायच्या आत पंधरा ते एकवीस दिवस नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरले जात होते.कारण सदर पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी व पाण्याची गळती होत होती.वितरण व्यवस्थेत दोष होता.(तो आजही आहे…) ती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकारांना तलाव क्रं.०१ ते ०४ वर घेऊन जावून सिद्ध केली होती.आजही तोच दावा सिद्ध होत आहे.कारण आ.आशुतोष काळे यांनी ते आपल्या कृतीने सिद्ध केले आहे. व आपल्या पूर्वसुरीनी जे केले त्यांची पुनरावृत्ती दाखवून दिली असल्याचे बोलले जात आहे.आता उन्हाळा केवळ उणापुरा एक महिना राहिला आहे.या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू झाली आहे कारण पुन्हा एकदा आगामी दिवाळीनंतर तब्बल चार वर्षाच्या विश्रांतीनंतर नगरपरिषद निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे.त्याची पूर्व तयारी सुरू झाली असल्याचे मानले जात आहे.नगर परिषदेने आपल्या उन्हाळी सवयीप्रमाणे आठ दिवसाआड पाणी केले आहे.त्यामुळे त्यांनी या तलावाच्या जलवाहिनीच्या जोडणीच्या सूचना केल्या असल्याचे मानले जात आहे.त्यामुळेच साठवण तलाव आणि त्या तलावाच्या जोडणीची पुंगी वाजली असल्याचे मानले जात आहे.