जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

छत्रपती शिवरायांचे स्वराज्य नवीन पिढीचे प्रेरणास्थान

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात अतिशय प्रेम आणि आदराची भावना आहे.राष्ट्राचे अस्तित्व निर्माण करून स्वातंत्र्याची नवऊर्जा आणि नवचैतन्य प्रदान करण्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जात असून त्यांच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले होते आजही ते तरुणांचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एक कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिषेक व पूजन करतांना आ.आशुतोष काळे.

सन-१६७४ मध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला.किल्ले रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना छत्रपती ही पदवीही देण्यात आली होती.त्याचे स्मरण आजही तेवढ्याच आत्मीयतेने केले जाते.कोपरगाव शहरातही हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

     छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा आणि आराध्य दैवत मानले जातात.दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा उत्सव विशेष थाटामाटात साजरा केला जातो.३५० वर्षांपूर्वी ६ जून १६७४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला होता.१६७४ मध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला.रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना छत्रपती ही पदवीही देण्यात आली होती.त्याचे स्मरण आजही तेवढ्याच आत्मीयतेने केले जाते.कोपरगाव शहरातही हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले.महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात येवून महाआरती करण्यात आली व मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते याप्रसंगी बोलत होते.

   सदर प्रसंगी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगूले,उपाध्यक्ष अशोक लव्हाट,राजेंद्र वाघचौरे,वैभव आढाव,डॉ.अनिरुद्ध काळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सदर प्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती असलेल्या शिवाजी महाराजांनी मोठी कामगिरी करत मध्ययुगीन काळात देशावर परकीय शत्रूंसह सात पातशाह्यांना मोडून काढले व लोकांना या गुलामगिरीतून मुक्त केले.त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहिली पहाट उदयास आणून लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावला होता.कुशल प्रशासनकर्ते असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शासनपद्धती चालविली त्यांच्या आदर्श कार्यपद्धतीचा आजही आधार घेतला जातो यावरून महाराज अद्वितीय,उत्कृष्ट राज्यकर्ते असल्याचे अधोरेखित होते.त्यांचे शासन त्यांनी आखलेल्या कायद्यांच्या चौकटीनुसार चालत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावायची कोणाची हिंमत त्यावेळी कुणी करीत नसे.दीनदुबळ्या लोकांनासुद्धा महाराजांच्या राज्यात संरक्षण मिळत असल्यामुळे महाराजांची कीर्ती महान ठरली असून असा राजा पुन्हा होणार नाही असे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close